मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन मुलांसह मिळून 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडीतेचे अश्लील व्हिडिओ बनवून अडल्ट साईटवर अपलोड केले आहेत. विशेष म्हणजे ज्या महिलेसोबत हे धक्कादायक कृत्य घडले आहे. ती महिला आरोपीची दुसरी पत्नी आहे, तर त्या दोन मुलांची महिला सावत्र आई आहे. या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडीत महिलेचा 2010 ला पहिल्या पतीशी घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर 2015 ला तिची भेट आरोपीशी झाली होती. आणि याच वर्षी महिलेने आरोपीशी लग्न केले आणि ते चिता कॅम्प ट्रॉम्बे येथे राहत होते. महिलेला पहिल्या लग्नापासून 8 आणि 10 वर्षांची दोन मुले आहेत.
या दरम्यान कोरोना महामारी आली आणि लॉक़डाऊल लागले. या लॉकडाऊनमध्ये महिलेच्या पतीचे त्याच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. या लग्नापासून आरोपीला 20 आणि 22 वर्षाची दोन मुले होते. घटस्फोटानंतर आरोपी दोन मुलांसह महिलेसोबत राहायला लागला.
दारू पाजून बलात्कार
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने 22 जूनला दारूत गुंगीचे औषध देऊन पाजले. यामुळे ती बेशूद्ध झाली होती. यानंतर आरोपीने आपल्या मुलांनाही दारू पाजली आणि पीडीतेवर बलात्कार करायला लावले. आरोपीने इतक्यावरच थांबला नाही त्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून तो पॉर्न साईटवर अपलोड केला. आरोपीच्या फोनमध्ये हे व्हिडिओ आढळल्यानंतर पीडित महिलेने शुक्रवारी पहाटे 2 वाजता पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी सांगितले की, घटनेनंतर तिघेही फरार होते, पण त सायन कोळीवाड्यातील मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करत त्यांना अटक करण्यात आली. तसेच मुख्य आरोपीच्या फोनवर पोलिसांना त्याच्या पत्नीचे 700 पॉर्न व्हिडिओ सापडले. चौकशीत त्याने पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडिओ साइटवर अपलोड केल्याची कबुली दिली.
या तिघांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ३७६ (बलात्कार), ३७६ (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), ३७६ (ड) (सामूहिक बलात्कार) आणि ३२३ (स्वच्छेने दुखापत करणे) या कलमांचा समावेश केला आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 67 (a) (लैंगिकरित्या सुस्पष्ट कृत्य असलेली सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे). या कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT