Rape Case: झारखंडमधील (Jharkhand) सरायकेला जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. 5 तरुणांनी तिला आपल्या वासनेची शिकार बनवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने पोलीस प्रशासनाकडून तिच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
मित्राने बोलवल्याचा खोटो निरोप
पोलिसांनी सांगितले की, शाळा दुपारी तीन वाजता सुटली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा मित्र तिला दुचाकीवरुन एका शेतामध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर त्याच शेतात 5 मुलांनी येऊन तिला तुझा मित्र नदीवर बोलवत असल्याचे तिला सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मुलगीही त्यांच्याबरोबर गेली. त्यानंतर त्या 5 मुलांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले.
हे ही वाचा >> भयंकर.. डिलिव्हरीनंतर महिला रुग्णालयातून बेपत्ता, 24 तासाने नाल्यात सापडला मृतदेह!
सामुहिक बलात्कार
ही घटना घडल्यानंतर मुलीने घरी येऊन घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यावेळी त्या मुलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर ज्या मुलांनी सामुहिक बलात्कार केला होता. त्या संबंधितावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी राजनगर राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेतील संबंधित 5 तरुणांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
