Mira Road Murder Case: मुंबई: मुंबईतील मीरा रोड हत्याकांडातील (Mira Road Murder) आरोपी मनोज साने (Manoj Sane) याने सरस्वती वैद्यची (Saraswati Vaidya) हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी झाड कापण्याचे यंत्र आणले होते. पण मृतदेहाचे तुकडे करताना त्या कटरची चेन निघाली होती. हाच कटर दुरुस्त करण्यासाठी तो भाईंदर येथील एका दुकानात गेला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, 4 जून रोजी सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोज कटर घेऊन दुकानात पोहोचला होता. आता मनोजने सरस्वतीची हत्या कशी केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मनोजने चाकूने तिची हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. (mira road murder accused manoj sane live in relationship saraswati vaidya dead body cut pieces cutter cooker police crime news)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीच्या हत्येत मनोजने जे कटर वापरलं होतं ते दुरुस्त करण्यासाठी तो जिथे गेला होता ती जागा आता पोलिसांना सापडली आहे. कार्तिक एंटरप्राइज असे त्या दुकानाचे नाव सांगितले जात आहे. चार दिवसांपूर्वी मनोज साने या दुकानात पोहोचला होता आणि दुकानदाराने त्याला कटर दुरुस्त करून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खरं तर त्या कटरची चेन निघाली होती. त्यामुळे आता पोलीस सरस्वतीच्या हत्येमागचा हेतू काय होता याचा तपास करत आहेत. हा संपूर्ण प्रकार सुनियोजित असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सरस्वतीसोबत तीन वर्षांपासून मनोज राहत हो लिव्ह इनमध्ये
पोलिसांचे म्हणणे आहे की, 32 वर्षीय सरस्वती वैद्य ही रेशन दुकानावर काम करणाऱ्या मनोज सानेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मीरा रोड पूर्व येथील गीता आकाशदीप इमारतीच्या सातव्या मजल्यावर हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून राहत होते. मनोजच्या शेजाऱ्याला बुधवारी साने यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्याने मनोजला वास कुठून येतोय असे विचारले असता मनोज घाबरला होता.
हे ही वाचा >> ‘घरी ये, मी एकटीच आहे’, मॅसेज मिळताच प्रियकर विवाहितेच्या घरी पोहोचला अन्…
पोलिसांचे म्हणणे आहे की, शेजाऱ्यांनी सांगितले की, मनोज साने त्याच्या फ्लॅटमधून काळ्या रंगाची सॅक घेऊन बाहेर आला होता. त्याने लोकांना सांगितले की तो रात्री 10.30 पर्यंत परत येईल. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. बराच वेळ आतून काहीच उत्तर न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. ज्यानंतर आतलं दृश्य पाहून पोलीस देखील हादरून गेले होते.
कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे, बादल्यांमध्ये रक्त
मनोजच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये पोलिसांना प्लास्टिकची पिशवी आणि रक्ताने माखलेले कटर सापडलं. यादरम्यान पोलीस स्वयंपाकघरात शिरले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला होता. किचनमध्ये ठेवलेला प्रेशर कुकर आणि काही भांड्यांमध्ये मानवी मांस उकडलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच महिलेचे केस जमिनीवर पडलेले आढळले. याशिवाय अर्धी जळालेली हाडे आणि मांस, बादल्यांमध्ये रक्तही भरलेलं होतं.
4 जून रोजी सरस्वतीची हत्या, मृतदेहाची हळूहळू विल्हेवाट
प्राथमिक तपासाचा हवाला देत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज सानेने 4 जून रोजी वैद्य यांची हत्या केली असावी आणि शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जात होता. ‘आपल्या लिव्ह-इन पार्टनरने आत्महत्या केल्याचा दावा करून साने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र संपूर्ण चौकशीनंतर सत्य बाहेर येईल’, असे पोलिसांनी सांगितले. मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांचे डीसीपी झोन I जयंत बजबळे यांनी सांगितले की, मृतदेहाचे अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
आरोपी मनोजला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
नया नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज साने याच्याविरुद्ध कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागचा हेतू समजू शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी 56 वर्षीय मनोज साने याला अटक केली. न्यायालयाने मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा >> Sakshi Murdered : साक्षीची एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘बाईक राईड’ अन् साहिलने…
मनोज सानेचे शेजारी काय म्हणाले?
दरम्यान, सानेच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, मनोज आणि सरस्वती हे कोणाशी जास्त बोलत नव्हते. दोघांची भांडणं झाली असंही कधी समजलं नव्हतं. किंवा त्यांच्या भांडणाचा आवाजही कधी ऐकू आला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून मनोज साने भटक्या कुत्र्यांना काही तरी खाऊ घालत होता. पण यापूर्वी कधीही तो कुत्र्यांना अशा पद्धतीने खायला घालत नव्हता. असंही त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.
आरोपी मनोज सानेने पोलीस चौकशीत काय सांगितले?
सरस्वती वैद्य हिची हत्या आपण केली नसल्याचे आरोपी मनोज साने याने चौकशीत पोलिसांना सांगितले. मनोजने पोलिसांना सांगितले की, सरस्वतीने 3 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती, त्यामुळे तो घाबरला आणि त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मनोजने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 3 जून रोजी जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा सरस्वती जमिनीवर पडली होती, तिच्या तोंडातून फेस येत होता.
नीट पाहिले असता सरस्वतीचा मृत्यू झाल्याचे मनोजने पोलिसांना सांगितले. यानंतर तो घाबरला. दोष आपल्यावर येईल असे त्याला वाटले, म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याने निर्णय घेतला. मनोजने सांगितले की, त्याने आधी कटरने शरीराचे अवयव कापले. यानंतर, ते प्रेशर कुकरमध्ये उकळले, जेणेकरून मांस आणि हाडे वेगळे होतात आणि वास पसरत नाही. त्याने आधीच शरीराचे काही भाग फेकले आहेत.
मनोजच्या वक्तव्यावर पोलीस काय म्हणाले?
या दृष्टिकोनातूनही तपास करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेले अवयव तपासणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तपासात गोष्टी अधिक स्पष्ट होतील. आरोपी मनोज सानेने केलेल्या दाव्याशी पोलीस सहमत नाहीत. मनोज हा अतिशय हुशार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नाही. त्यांनी अनेकदा आपली विधानं बदलली आहेत. आरोपी अनेक खोटी वक्तव्ये करत आहे. तपास किंवा पुराव्याशिवाय पोलीस त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत.
पोलीस डीएनए चाचणी करणार, बहिणींचीही चौकशी
फॉरेन्सिकच्या मदतीने पोलीस डीएनए तपासणार आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपी मनोज साने याने सरस्वतीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते, जे ओळखणे कठीण होते. मनोजने सरस्वतीचं मुंडकंही धडा वेगळं केल्याचे पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळलेले असल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड होते. आता डीएनए चाचणी हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी सरस्वती बहिणींचे जबाब नोंदवत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनोजचे सरस्वतीसोबत अनेकदा भांडण होत असे. आरोपी मनोजने केलेल्या खुनाची माहिती बहिणींना होती का, अशीही चौकशी पोलीस करत आहेत. बहिणी सरस्वतीच्या संपर्कात होत्या, मात्र सरस्वतीने त्यांना काय-काय सांगितलं, हे विधान महत्त्वाचे असणार आहे. सरस्वतीच्या बहिणींपैकी एक बहीण ही जेजे रुग्णलयात गेली होती. जिते तिची डीएनए चाचणी केली जाणार आहे.
अहमदनगर कनेक्शन आले समोर
न्यायालयाच्या आदेशाने सरस्वती वैद्य हिला 2008 साली अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रमात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाचा आदेश काय होता याचा तपास आता पोलीस करत आहेत. सरस्वतीचे दहावीपर्यंतचे शिक्षण आश्रमात झाले होते. आश्रमात तिची वागणूक ही चांगली होती. तिला आश्रमात दाखल करण्यात आले तेव्हा ती अल्पवयीन होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आश्रम सोडून मुंबईत आली होती.
ADVERTISEMENT