Mira Road Murder Case: मुंबई: मीरा रोड हत्येप्रकरणी (Mira Road Murder) अनेक धक्कादायक खुलासे हे सध्या होत आहेत. ज्यामधील आरोपी मनोज साने (Manoj Sane) हा अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस अधिकारी सांगत आहेत. अशातच मनोजने तो HIV पॉझिटिव्ह असून आपण कधीही सरस्वतीशी (Saraswati Vaidya) लैंगिक संबंध ठेवले नाही. असं म्हणत तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं. मात्र, पोलीस देखील मनोज सानेची मानसिकता लक्षात घेऊन तपासाची दिशा निश्चित करत आहेत. (mira road murder case manoj sane hiv positive theory saraswati vaidya live in partner crime news police)
ADVERTISEMENT
गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पण मनोज साने चाणाक्ष आरोपी…
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पण तो अतिशय हुशार आणि पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. तो सतत आपली विधाने बदलत राहतो आणि स्वत:च्याच विधानांचे खंडन करतोय. आधी आरोपी मनोजने सरस्वती बेपत्ता असल्याचे सांगितले होते. नंतर त्याने सांगितलं की, सरस्वती हिने आत्महत्या केली आणि त्यामुळे आपण घाबरलो.
मनोज साने खरंच HIV पॉझिटिव्ह?
आता यामध्येच आरोपी मनोज सानेने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा मुद्दा देखील पुढे करून एक नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याने असंही म्हटलं की, त्याने तिच्याशी कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्याबाबत मुंबई Tak शी बोलताना सांगितलं की, मनोज साने जे दावे करत आहे त्यावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही.
हे ही वाचा >> Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story
मनोजला हे चांगलेच ठाऊक आहे की त्याने संपूर्ण पुरावे नष्ट केले आहेत आणि केसमध्ये काहीही सिद्ध करणे खूप कठीण आहे. शवविच्छेदन (post mortem) हे अत्यंत निर्णायक आहे. परंतु शवविच्छेदनातून पुन्हा काहीतरी मिळवणे खूप कठीण काम आहे. त्यामुळे याप्रकरणात जेजे रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टरांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याच्या दाव्यात कोणतीही योग्यता नाही. तो वेगवेगळ्या थेअरी रचून सांगत आहे. जेणेकरुन तपासाची दिशाभूल व्हावी असा त्याचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तो HIV पॉझिटिव्ह असण्याचा.
जरी तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असला तरी त्याचा केस किंवा तपासावर परिणाम होणार नाही. कारण त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्याने गुन्हा केला आहे ज्याचा त्याच्याशी संबंध नाही. परंतु भविष्यात आम्ही त्याची एचआयव्ही चाचणी करू. त्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह येवो अथवा निगेटिव्ह त्याचा काहीही परिणाम या केसवर होणार नाही.
हे ही वाचा >> “तुझ्यासारख्या गिधाडाला…”; जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ‘राजकीय दंगल’
त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि सरस्वती वैद्यची हत्या ही नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
ADVERTISEMENT