Mumbai Crime: गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीच्या (drug) वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. नुकताच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर जोरदार कारवाई चालू असतानाच महसूल गुप्तचर संचालनालयाने कोकेन तस्करी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) कोकेन तस्करी करणाऱ्या तीन आफ्रिकन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. आफ्रिकन महिलांवर (African women) शुक्रवारी कारवाई केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT
कोकेनसाठी सॅनिटरीचा वापर
या प्रकरणी अधिकाऱ्याने सांगितले की, डीआरआयच्या मुंबई युनिटने गेल्या तीन दिवसांत ही मोठी कारवाई केली आहे. कोकेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन युगांडाच्या नागरिकांनी सॅनिटरी नॅपकिन्समध्ये कोकेन लपवून ठेवले होते. तर टांझानियातील एका महिलेने कोकेन असलेली कॅप्सूल गिळली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांनी लपवून ठेवलेल्या कोकेनमुळे अधिकाऱ्यांनाच धक्का बसला आहे.
हे ही वाचा >>IND Vs PAK: भारत-पाक सामन्याला उरले अवघे काही तास, ‘इथे’ पाहाता येईल Free सामना
न्यायालयीन कोठडीत
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिघांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आफ्रिकन महिलांचा संशय आल्यानंतर त्यांनी कसून चौकशीला सुरुवात केली.
परदेशी महिलांना ताब्यात
मुंबई विमानतळावर 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले गेले. डीआरआयने तीनही परदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आरोपी महिलांकडून सॅनिटरी पॅड आणि गुदद्वारातून कोकेनची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. डीआरआयकडून 568 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून युगांडाच्या दोन महिला आणि एका टांझानियन महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT