Nashik Kidnapping Video : कालपासून सोशल मीडियावर एक CCTV कॅमेऱ्यातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आणि मुलगी रस्त्यावर जात असतात. तेवढ्यात एक मुलगा धावत येतो, त्यानंतर एक गाडी येते आणि मुलीचं अपहरण करुन गुंड तिला घेऊन जातात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एखाद्या चित्रपटातला सिन वाटावा तशी ही संतापजनक घटना असल्यासारखी दिसतेय. या व्हिडीओवर लोकांनी संताप व्यक्त केला असून, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं म्हटलं आहे. मात्र, यामागे आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
हे ही वाचा >> "एवढ्या वर्षांनी उकरुन काढण्याची काय गरज? 'औरंगजेबाच्या कबरी'वरुन अजितदादांनी राणेंसह सगळ्यांचेच कान टोचले
नाशिकमध्ये एका जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्या वाद होत होते. मात्र नंतर एका वादामुळे पत्नीने थेट माहेर गाठलं होतं. यानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचे पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण करण्याचा आरोप पत्नीच्या आईने केला आहे. त्यामुळे या घटनेत हा एक मोठा ट्विस्ट आहे. 19 वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्यानं जात असताना पतीकडून मित्रांच्या मदतीने पत्नीचे अपहरण केल्याचा व्हिडीओ राज्यात व्हायरल झाला होता. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या घटनेत पत्नीच्या आईला धक्काबुक्की करत मुलाने चारचाकी गाडीत लोटून आपल्या पत्नीला पळवून नेलं.
पोलिसांकडून पतीवर गुन्हा दाखल
प्रेमविवाहानंतर भांडण झाल्यानं पत्नी माहेरी निघून आली होती. पत्नी परत येत नसल्यानं पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 19 मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे. अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. घटनेनंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
हे ही वाचा >> औरंगजेब महान आहे हे म्हणायची अबू आझमींना काय गरज होती? इम्तियाज जलील यांनी सांगितली भाजपची क्रोनॉलॉजी
अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली. अपहरण झालेल्या पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली. तर पतीला अटक करण्यात आली आहे. अपहरण करणाऱ्या पती वैभव पवार विरोधात सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
