Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील तळोजा परिसरात एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये खेळण्यांवरून वाद झाला, त्यातूनच मुलीची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अन्सारीची पत्नी आणि मृत मुलीच्या आईमध्ये खेळण्यांवरून भांडण झालं होतं. हा किरकोळ वाद इतका वाढला की आरोपीने एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
डीसीपी (झोन 2) प्रशांत मोहिते पाटील यांनी सांगितलं की, आरोपी तरुण मोहम्मद अन्सारी याला ड्रग्ज, मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन होतं. या खेळांमध्ये तो जवळपास 40,000 हजार रुपये हारला होता. मानसिक तणावात होता. यादरम्यानच अन्सारीने जुन्या वादातून अन्सारीने सूडाच्या भावनेतून हा भीषण गुन्हा केला.
बापाकडे मागितली खंडणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 तारखेला शर्मा यांची मुलगी सापडत नव्हती. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यातच 26 तारखेला रात्री मुलीचा मृतदेह एका पिशवीत लपवून पीडित कुटुंबाच्या घरातील टॉयलेट सीटवर ठेवला होता. तेव्हा हे पाहून कुटुंब हादरलं. यादरम्यान, आरोपीने मुलीचं अपहरण झाल्याचं सांगून बापाकडे खंडणीही मागितली.
हे ही वाचा >> ‘एसंशि’, ‘एसंशि’ असं सारखं का बोलत होते उद्धव ठाकरे.. 'या' शब्दाचा नेमका अर्थ काय?
दरम्यान, यानंतर अमरीश शर्मा यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, संशयाची सुई मोहम्मद अन्सारी यांच्याकडे वळली. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. तळोजा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा हात आहे का? आरोपीने एकट्यानेच हा गुन्हा केला आहे का? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
ADVERTISEMENT
