Newsclick Raid : पत्रकारांच्या घरावर धाडी, मोबाईल-लॅपटॉप जप्त, प्रकरण काय?

मुंबई तक

03 Oct 2023 (अपडेटेड: 03 Oct 2023, 07:31 AM)

न्यूजक्लिक वेबपोर्टलवर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली असून पत्रकारांच्या घरावर आणि कार्यालयावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईत पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

newsclick receiving funding China delhi police action journalists laptops mobile phones seized allegation Enforcement Directorate

newsclick receiving funding China delhi police action journalists laptops mobile phones seized allegation Enforcement Directorate

follow google news

Newsclick : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून राजधानी दिल्लीसह न्यूजक्लिक वेबसाईटच्या (Newsclick website) पत्रकारांवर धाड टाकण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून (Delhi Police special Cell) झालेली ही कारवाई फॉरेन फंडिंगप्रकरणी (Foreign Funding) झाल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकारांवर ही कारवाई UAPA अंतर्गत केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली असून दिल्ली, नोएडा, गाजियाबाद (Delhi, Noida, Ghaziabad) या ठिकाणी पत्रकारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, 30 पेक्षा जास्त ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती स्पेशल सेलच्या पोलिसांनी सांगितली. (newsclick delhi police action receiving funding from china journalists laptops mobile phones seized allegation)

हे वाचलं का?

UAPA अंतर्गत कारवाई

पोलिसांनी धाड टाकल्यानंतर इलेक्ट्रॉनिक साहित्य, लॅपटॉप, मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्याच बरोबर हार्ड डिस्कमधील डाटाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही UAPA अंतर्गत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर पत्रकार अभिसार शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी आपला लॅपटॉप आणि त्यांचा फोन जप्त केला असल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे.

हे ही वाचा >> Nanded Hospital : नांदेडनंतर संभाजीनगरातही मृत्यूतांडव! ‘घाटी’त 10 रुग्णांचा मृत्यू

कारवाईत निमलष्करी दलही

UAPA अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईत स्पेशल सेलचे 100 हून अधिक पोलीस सहभागी आहेत. या कारवाईदरम्यान स्पेशल सेलबरोबरच निमलष्करी दलाचे जवानही यामध्ये सहभागी झाले आहेत. सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे निमलष्करी दलाचे जवान त्यांच्यासोबत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलीस सध्या कारवाईमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती सांगितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या स्पेशल सेलचे सर्वच अधिकारी या कारवाईत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

 

ईडीने दिली माहिती

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून ही कारवाई केली जात असून 17 ऑगस्ट रोजीच दिल्ली पोलिसांनी याबाबत काही सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की, दोन गटामधील वैर वाढवणे आणि वेगवेगळे कट आखणे यासारखी कलमं लावण्यात आली आहेत. ईडीकडून दिल्ली पोलिसांना एक माहिती मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. त्या कारवाईबाबत सांगण्यात आले की, ईडीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली आहेत. ईडीच्या तपासानुसार 3 वर्षात 38.5 कोटी रुपयांचा विदेशी निधी उघड झाला असून हा निधी बनावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आता गौतम नवलखा आणि तीस्ता सेटलवाड यांचे नाव आले आहे.

चीनमधून पैसा

ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर मोठ्या रक्कमेचे पैशाचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात 9.59 कोटी रुपये एफडीआयच्या माध्यमातून तर 28.46 कोटी रुपये सेवा निर्यातीच्या बदल्यात दिल्याचे उघड झाले आहे. चीनमधून आलेला पैसा काही परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून न्यूजक्लिकपर्यंत पोहोचला असून न्यूजक्लिकबरोबर संबंधित असलेल्या पत्रकारांनाही यामधीलच पैसे देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हे ही वाचा >> Ujjain Rape Case : ‘माझं तोंड दाबलं, कुर्ता फाडला अन्…’ , सैतानी कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी कसं शोधलं?

बेकायदेशीर फंड

न्यूजक्लिकवर 2011 मध्येच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बेकायदेशीर निधीबाबत गुन्हा दाखल केला होता. न्यूजक्लिकला मिळालेला फंड हा चीनच्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाकडून मात्र न्यूजक्लिकच्या संबंधित लोकांना अटक होण्यापासून वाचवले होते.

लोकसभेत न्यूजक्लिकवर आरोप

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी न्यूजक्लिकवर गंभीर आरोप करत त्यांनी न्यूजक्लिक हे देशविरोधी असल्याचे म्हटले होते. न्यूजक्लिकला मिळणाऱ्या फंडावरून खासदार दुबे यांनी लोकसभेत यावर आवाज उठविला होता. न्यूजक्लिकला जर चीनकडून फंड उपलब्ध होत असेल तर ते देशविरोधी असल्याचे त्यांनी आरोप केला होता.

अजेंडा कम्युनिस्टांचा

न्यूजक्लिकवर टीका करत असताना निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीका करताना म्हटले होते की, द न्यूयॉर्क टाईम्ससारखी वृत्तपत्रही हे मान्य करतात की, नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा जगभर अजेंडा राबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

    follow whatsapp