'नवरा म्हणाला तू जावयासोबतच पळून जा, मी गेले पळून...', सासूचा 'तो' VIDEO आला समोर!

आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून जाणाऱ्या अनिताने पोलिसांना तिच्या अशा वागण्यामागचं कारण सांगितलं. हे सांगताना तिने तिच्या नवऱ्यावर टोमणे मारण्याचे आणि मारहाणीचे आरोप केले आहेत. अनिताने का केलं असं? पोलिसांसमोर झालं स्पष्ट

अलीगडमध्ये आपल्या जावयासह पळून गेलेल्या सासूने केला धक्कादायक खुलासा.

Aligarh Crime new update

मुंबई तक

17 Apr 2025 (अपडेटेड: 17 Apr 2025, 04:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावयासोबत पळून गेलेल्या सासूचं पोलिसांना उत्तर

point

पोलिसांना काय म्हणाली अनिता?

point

जावयासोबत पळून जाण्यामागचं नेमकं कारण काय?

Mother-in-law and Son-in-law Love Story: अलिगढ: अलिगढमधील जावई आणि सासूची लव्ह स्टोरी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. पळून गेलेले हे दोघेही आता थेट पोलिसांना शरण आले आहेत. पण त्यानंतर सासू अनिता हिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्या जावई राहुल आणि सासू अनिता हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. याचदरम्यान, सासू अनिताचा एक व्हिडिओ हा समोर आला आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की, 'मला नवरा नेहमी म्हणायचा की, तू जावयासोबतच पळून जा. असे टोमणे रोज मारायचा. दररोज शिव्या ऐकाव्या लागत होत्या, म्हणून मी माझ्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेले', असं रडत-रडत अनिताने पोलिसांना सांगितलं.

हे वाचलं का?

यापुढे ती तिचा पती जितेंद्रसोबत राहू शकणार नसल्याचंही तिने सांगितलं. कारण, वर्षानुवर्षे नवरा तिला मारत असल्याचा आरोप अनिताने केला आहे. ती म्हणाली, " मी पळून गेल्याची घटना तुम्हाला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसारखी वाटत असली तरी त्यामागे खुप दु:ख आणि वेदना आहेत."

200 रुपये आणि मोबाइल घेऊन पळाली

अनिता देवी यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितले की, 'मी पैसे घेऊन पळून गेल्याचे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मी फक्त 200 रुपये आणि माझा मोबाFल घेऊन घराबाहेर पडले होते. माझे कपडेसुद्धा व्यवस्थित नव्हते आणि त्यावेळी राहुलने मला आधार दिला.'

महिन्याला फक्त 1500 रुपये मिळत होते

पोलिसांना सांगताना अनिता म्हणाली, 'माझे पती जितेंद्र मला महिन्याला फक्त 1500 रुपये द्यायचे आणि त्याचा हिशोबसुद्धा द्यावा लागायचा. जर थोडे जास्त खर्च झाले तर टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे, हे ठरलेलं होतं. मी माझ्या लग्नानंतर इतकी वर्षे घालवली, पण मला प्रेम कधीच मिळाले नाही. फक्त अपमान, मारहाण आणि टोमणे."

हे ही वाचा: होणारी पत्नी ब्यूटी पार्लरमध्ये गेली अन् नको ते करून बसली.. 'ती' गोष्ट समजली अन् नवरदेव भर मंडपात बेशुद्ध!

राहुलशी कशी झाली जवळीक

अनिता देवीच्या मुलीचे लग्न राहुलसोबत ठरले होते. अनिता आणि राहुलचे संबंध कसे जुळले? याबद्दल ती पोलिसांना सांगताना म्हणाली, "लग्नाची तयारी सुरू होती. अशातच मी राहुलशी फोनवर बोलायचे. यामुळे माझ्या मुलीला माझ्यावर संशय येऊ लागला आणि घरात भांडणे वाढू लागली. माझ्या नवऱ्यानेही मला टोमणे मारायला सुरुवात केली. जा, तुझ्या जावयाला घेऊन पळून जा, असं मला नेहमी म्हणायचे." 

अनिताने सांगितल्याप्रमाणे, नवऱ्याच्या आणि मुलीच्या टोमण्याला अनिता कंटाळली होती. त्यांचं असं वागणं अनिताला सहन होत नव्हतं. त्यामुळे तिचा नवरा जसं म्हणत होता, तसंच तिने केलं. राहुलच्या मते, अनिताला तो चांगलं ओळखत होता. बऱ्याच वेळा त्याने अनिताला रडताना आणि कोणाशीही नीट बोलत नसल्याचं पाहिलेलं. जेव्हा त्याने याचं कारण अनिताला विचारलं तेव्हा अनिताने त्याला तिचं दु:ख सांगितलं.

हे ही वाचा: नाशिकमध्ये 'मशाल' पेटली! "शिंदे फितूर आणि गद्दार, तर भाजप...", AI बाळासाहेबांचं भाषण वाचा जसच्या तसंं

मित्रांनी केली मदत

यादरम्यान, महेश कुमारने सांगितलं, "जावयाला म्हणजेच राहुलला एक मोबाईल फोन दिला होता आणि याच्या साहाय्याने मागील तीन महिन्यांपासून त्याच्यामध्ये आणि त्याच्या होणाऱ्या सासूमध्ये तासन् तास गप्पा रंगत होत्या, असं पोलिसांच्या तापासातून समोर आलं. यानंतर, ती काहीतरी कारण सांगून घराबाहेर पडली. तसंच पुढे महेश म्हणाला की "राहुलच्या वडिलांची आणि मेहुण्याची चौकशी केल्यानंतर सपना आणि राहुलला कासगंज रेल्वे स्टेशनवर सोडणाऱ्या काही मित्रांची नावे समोर आली.  तिथल्या सीसीटीव्ही फुटेजवरूनही हे स्पष्ट झालं."

जादू-टोणा केल्याचा आरोप

तसेच आरोपी तरुणाच्या वडिलांनी त्याच्या मुलावर वशिकरण केल्याचा आरोप अनितावर केला आहे. ते म्हणाले की जेव्हा अनिता देवी त्यांच्या घरी गेली तेव्हा तिने त्याच्या मुलाला दोन ताबीज बांधले होते, त्यानंतर त्याच्या मुलाचे वर्तन पूर्णपणे बदलले. पोलिसांनी राहुलच्या वडिलांची आणि त्याच्या मेहुण्याची चौकशी केली होती. 

    follow whatsapp