Girl Child: अवघ्या 7 दिवसांच्या मुलीला क्रूर आई-वडिलांनी फेकलं कुत्र्यांसमोर, पण..

Parents threw newborn baby girl in front of dogs: एका सात दिवसांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी भुकेल्या कुत्र्यांसमोर फेकून दिल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. पण त्यानंतर येथील नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि आस्था याला मुंबई Tak चा सलाम

parents threw their newborn baby girl in front of hungry dogs this incident in alwar rajasthan will shock you

parents threw their newborn baby girl in front of hungry dogs this incident in alwar rajasthan will shock you

रोहित गोळे

• 09:44 AM • 15 Sep 2023

follow google news

Alwar Rajasthan: राजस्थान: देव तारी कोण मारी.. अशी एक म्हण ही अवघ्या सात दिवसांच्या मुलीसाठी तंतोतंत लागू पडत आहे. पण त्यापेक्षाही या नवजात मुलीच्या (newborn baby girl) आई-वडिलांनी जे कृत्य केलं आहे त्याने तुम्हाला राग अनावर होईल. राजस्थानमधील अलवरच्या नौगावा इथे एका दाम्पत्याला मुलगी झाली. पण मुलीचा जन्म होताच तिच्या क्रूर पालकांनी तिला संपवून टाकण्यासाठी भटक्या कुत्र्यांसमोर फेकून दिलं. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळंच होतं. (parents threw their newborn baby girl in front of hungry dogs this incident in alwar rajasthan will shock you)

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की, उलट्या काळजाच्या आई-वडिलांनी सात दिवसांच्या मुलीला रस्त्याच्या कडेला भटक्या कुत्र्यांसमोर फेकून दिलं होतं. खरं तर मुलीचं मरण निश्चित होतं. पण त्याच वेळी याच रस्त्याने जाणाऱ्या एका मुस्लिम तरुणाने चिमुकलीला पाहिलं. त्यानंतर त्याने तात्काळ मुलीला उचलून नजीकच्या दवाखान्यात नेलं.

दरम्यान, मुलगी सापडल्याची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ही मुलगी रुग्णालयात आली तेव्हा ती खूप उपाशी होती. त्यामुळे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने मुलीला दूध पाजले. मुलीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर ती पूर्णपणे निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही वेळातच मुलीला दत्तक घेण्यासाठी लोकही रुग्णालयात येऊ लागले. पण मुलगी दत्तक घेण्याची प्रक्रिया सरकारी आहे, त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे डॉक्टरांनी मुलाला ताब्यात देण्यास नकार दिल्याने तिला सरकारी कोठडीत मदर तेरेसा होममध्ये पाठवले.

नेमकी घटना काय?

लुकमान इस्लाम हा हाजीपूर गावातील सरकारी शाळेजवळून जात होता. यावेळी त्याला जवळच केळीच्या पानांवर कापडात गुंडाळलेले नवजात अर्भक त्याला आढळून आले. त्यावेळी कुत्रेही इकडे तिकडे फिरत होते. त्यामुळे त्याने तात्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी पोहोचले.

हे ही वाचा>> Neha Shourie : 100 कोटीचा घोटाळा उघड करणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या मर्डरची Inside Story

गावातील लुकमान, राजपाल आणि विक्रम हे नवजात अर्भकाला घेऊन नौगाव आरोग्य सामुदायिक केंद्रात आले. आरोग्य सामुदायिक केंद्राचे डॉ. सुनील गुप्ता यांनी मुलीच्या तपासणीदरम्यान सांगितले की, नवजात मुलगी 7 किंवा 8 दिवसांची आहे. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. नवजात मुलगी भुकेने रडत होती. अशा स्थितीत रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका महिलीने तिला तातडीने दूध पाजले. तिने मुलीबाबत आपुलकी दाखवत आपलं प्रेमच या माध्यमातून व्यक्त केलं. या सगळ्यामुले रुग्णालयातील वातावरण देखील भावूक झालं.

आशा सहयोगिनीकडून रुग्णालयात मुलीची देखभाल

एक आशा सहकारी ही रुग्णालयात मुलीची काळजी घेत होती. त्यामुळे मुलगीही आशा सहयोगिनीला तिची आई समजू लागली. हे पाहून लोकांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली आणि काहीजण व्हिडिओ बनवतानाही दिसले. या मुलीची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नौगाव शहरातील लोकांनी करुणा दाखवून नवजात मुलीला दत्तक घेण्यासाठी तयारी दर्शवली.

हे ही वाचा>> Nanded : जवानाने गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीचा घेतला जीव! कारण जाणून पोलिसही चक्रावले

एकीकडे नवजात मुलीच्या पालकांनी तिला कुत्र्यांजवळ रस्त्यावर फेकून दिलं. त्यावेळी त्यांना किंचितही दया आली नाही. पण दुसरीकडे नवजात मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. आरोग्य सामुदायिक केंद्राचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली नवजात मुलीला आता शिशुगृहात नेण्यात आलं आहे.

पोलिसांचा तपास सुरू

रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस जवळच्या हॉस्पिटलची चौकशी करत आहेत. तसेच मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    follow whatsapp