Pune Crime: बहिणीचं मुंडकं छाटलं, भाऊ-वहिनीने अशी केली हत्या की, अवघं पुणं हादरलं!

मुंबई तक

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 04:42 PM)

Pune Crime News : पुण्याच्या मुठा नदी पात्रात महिलेचे शीर आणि हात पाय नसलेला एक मृतदेह 26 ऑगस्टच्या रोजी सकाळी आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला होता. या तपासा दरम्यान मृत महिलेचे नाव सकिना खान (48) असल्याची माहिती समोर आली होती. सकिना ही शिवाजी नगर भागातील एका झोपडपट्टीत राहायची.

pune crime news brother and her wife killed sister property dispute dumping dead body in mutha river pune police

मृतदेहाचं गुढ उकलण्यात आणि हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुठा नदीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं

point

सख्खा भाऊच निघाला बहिणीचा मारेकरी

point

सख्खा भावानेत बायकोसह मिळून केली बहिणीची हत्या

Pune Crime News: शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक समजलं जाणार पुणे आता गुन्हेगारीचे शहर बनत चाललं आहे. कारण एका मागुन एक गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. अशात आता पुण्यातून (Pune News) एक हादवरून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्याच्या मुठा (Mutha River) नदीपात्रात काही दिवसांपूर्वी महिलेचे शीर  आणि हात पाय नसलेला एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहावरून हत्येचा छडा लावणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र आता या मृतदेहाचं गुढ उकलण्यात आणि हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.  (pune crime news brother and her wife killed sister property dispute dumping dead body in mutha river pune police) 

हे वाचलं का?

पुण्याच्या मुठा नदी पात्रात महिलेचे शीर आणि हात पाय नसलेला एक मृतदेह 26 ऑगस्टच्या रोजी सकाळी आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला होता. या तपासा दरम्यान मृत महिलेचे नाव सकिना खान (48) असल्याची माहिती समोर आली होती. सकिना ही शिवाजी नगर भागातील एका झोपडपट्टीत राहायची. या दरम्यान सकिनाच्या हत्येपुर्वी तिचा भावासोबत वाद झाला होता. जमिनीच्या मालकी हक्कावरून दोघांमध्ये घरात कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर सकिना अचानक गायब झाली होती. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 31 ऑगस्ट शेवटची तारीख नाही! सरकार अर्ज करण्यासाठी देणार मुदतवाढ?

पोलिसांना या बहिण भावामधील भांडणाची माहिती मिळताच त्यांनी भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदाला ताब्यात घेतले होते. यानंतर या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबूली दिली होती. पोलीस चौकशीत आरोपी भाऊ आणि त्याच्या बायकोने सांगितले की, सकिना खानची गळा घोटून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीपात्रात प्रवाहीत केले होते. 

खरं तर जमिनीच्या मालकी हक्कावरून सकिना खान आणि भाऊ अशफाक खान यांच्यात वाद झाला होता. या वादातून अशफाक आणि त्याची बायको हमीदाने सकिनाची हत्या केली होती. यामुळे या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी जोडप्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (हत्या) आणि 238 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. 

    follow whatsapp