Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भवती प्रेयसीचा मृत्यू, नंतर दोन मुलांना जिवंत फेकलं नदीत

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 11:14 PM)

Pune Crime News : गर्भपाता दरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वैतागलेल्या प्रियकराने तिच्या दोन मुलांना नदीत फेकल्याची दुदैवी घटना घडली आहे. घटनेच्या तब्बल 13 दिवसानंतर याचा उलगडा झाला आहे.

pune maval crime news girl friend dies during miscarriage boy friend throw two children in rivers shocking crime story

पुण्याच्या मावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

गर्भपाता दरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना

point

वैतागलेल्या प्रियकराने तिच्या दोन मुलांना नदीत फेकलं

point

9 जुलैला ही घटना घडली होती.

Pune Crime News : कृष्णा पांचाळ, पुणे, मावळ :  पुण्याच्या मावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गर्भपाता दरम्यान प्रेयसीचा (Girl Friend) मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वैतागलेल्या प्रियकराने (Boy Friend) तिच्या दोन मुलांना नदीत फेकल्याची दुदैवी घटना घडली आहे. घटनेच्या तब्बल 13 दिवसानंतर याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी (Police) प्रियकर आणि त्याच्या मित्राला (Friend) अटक केली आहे. या घटनेने आता पुणे हादरलं आहे. (pune maval crime news girl friend dies during miscarriage boy friend throw two children in rivers shocking crime story) 

हे वाचलं का?

ही घटना 9 जुलै दरम्यान घडली होती. खरं तर प्रियकराचा मित्र रविकांत गायकवाड हा गर्भवती महिलेला आणि तिच्या 5 आणि  2 वर्षाच्या मुलासह घेऊन कळंबोळीला आला होता. कळंबोळीतील अमर हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे. मात्र या गर्भपाता दरम्यान 8 जुलैला (प्रेयसीचा)  महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेच्या मदतीने रविकांत गायकवाड गर्भवती महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना घेऊन मावळमध्ये पोहोचला होता.

हे ही वाचा : Maza Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेत फक्त 6 महिनेच मिळणार पैसे, असा नियम का?

9 जुलैच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैरने मित्र रविकांत गायकवाडसह इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात गर्भवती महिलेचा सोडून दिला. ही संपूर्ण घटना मृत महिलेची दोन्ही मुलं आपल्या डोळ्यांनी पाहत होते. त्यामुळे आई आपल्यापासून दुरावल्याचे पाहून त्यांनी देखील रडायला सुरूवात केली. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भितीने गजेंद्र तिच्या दोन मुलांवर कोणतीही दया माया न दाखवता त्यांना इंद्रायणी नदीत फेकून दिले होते. 

दरम्यान या सर्व घटनेनंतर दोन्ही आरोपी काही घडलंच नाही अशाप्रकारे वावरू लागले होते. तर तिकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी आरल्या मुलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपल्या मुलीशी संपर्क होत नसल्याच्या कारणाने काळजीपोटी कुटुंबियांनी तळेगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली होती. त्यामुळे पोलीस प्रियकर गजेंद्र दगडखैर पर्यंत पोहोचली होती. 

हे ही वाचा : Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहीण' नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, काय आहे पिंक रिक्षा योजना?

दरम्यान गजेंद्रची चौकशी केली असता गजेंद्रने अनेकदा प्रेयसीला फोन कॉल केल्याचे आणि त्याच दरम्यान मित्र गायकवाडलाही अनेकदा फोन कॉल केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी मित्रालाही देखील ताब्यात घेतले आणि दोघांची कसून चौकशी सुरु केली होती. मात्र दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी घटनेचा उलगला केला. या घटनेने आता पुणे हादरले आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे. 
 

    follow whatsapp