Darshana Pawar Murder : दर्शना पवारचा मारेकरी सापडला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांनी पुण्यापासून मुंबईपर्यंत सगळा भाग पालथा घातल्यानंतर राहुल हंडोरे पोलिसांच्या हाती लागला. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला मुंबईत अटक केली. त्याच्या अटकेनंतर दर्शनाच्या हत्येचे कारणही समोर आलं. (darshana pawar murder case : Pune police arrested rahul handore from mumbai)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी निवड झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. मित्र राहुल हंडोरेसोबत राजगड फिरायला गेलेल्या दर्शना पवारचा सीतेचा माळ परिसरात मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तिचा बेपत्ता असलेल्या मित्राचा शोध सुरू केला होता.
राहुल हंडोरेला बेड्या, पोलिसांना सांगितलं हत्येचे कारण
मृत्यूपूर्वी दर्शना राहुल हंडोरेसोबत होती. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथक तयार केली. ही पथके राहुल हंडोरेच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. ही पथके राहुलचा नाशिक, लोणावळ्यासह विविध ठिकाणी शोध घेत होती.
हेही वाचा >> Pune : बायकोच्या नरडीचा घेतला घोट, मुलं फेकली विहिरीत; सुसाईड नोट वाचून दौंड पोलीस हादरले!
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून पोलीस ज्याच्या मागावर होती, तो राहुल हंडोरे मुंबईत सापडला. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर लगेच अटकेची कारवाई केली. अटकेच्या कारवाईनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. ज्यात त्याने दर्शना पवारच्या हत्येचं कारणही सांगितलं.
दर्शनाच्या कुटुंबीयांनी विरोध केला अन्…
राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत, ही माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आले.
त्यावेळी दोघांचीही ओळख घट्ट झाली. दरम्यान, राहुल हंडोरेच्या मनात दर्शना पवारसोबत लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. दोघेही परीक्षेची तयारी करत असताना दर्शना परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवडही झाली.
हेही वाचा >> पंजाबचे तूप अन् महाराष्ट्रातील…’, मोदींनी बायडेन यांना कोणत्या भेटवस्तू दिल्या?
दुसरीकडे राहुल हंडोरेला परीक्षेत यश मिळत नव्हते. दरम्यान, राहुलने दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नाची इच्छा बोलून दाखवली आणि थोडा वेळ मागितला. पण, तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला. तिच्या कुटुंबीयांनी दर्शनाचे दुसऱ्या मुलाशी लग्नही ठरवले.
दर्शना पुण्यात आली आणि राहुलने संपवलं
नंतर सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली. 12 जून रोजी राहुल हंडोरे तिला राजगड बघायला घेऊन गेला. दोघे राजगडवर न जाताच पायथ्याशी असलेल्या सीतेचा माळ येथे गेले आणि त्यानंतर पुढे काय घडले याबद्दल अद्याप माहिती कळू शकली नाही. मात्र, सीतेचा माळ परिसरातच दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळला.
ADVERTISEMENT