Pune Crime News: पुणे: पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) काल (27 जून) थरारक घटना घडली. 18 वर्षीय तरुणीवर तरुणानं कोयत्यानं वार केला. ही घटना देखील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पण, त्यावेळी तो तरुण पीडित तरुणीला काय म्हणाला होता? त्यानं काय धमकी दिली होती? या सगळ्याची Inside Story आम्ही आपल्याला सांगणार आहोत. (pune sadashiv peth scythe attack college girl accused shantanu jadhav intention killing girl inside story crime news)
ADVERTISEMENT
‘आज एकाचा तरी मर्डर करतोच…’
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील त्या पीडित तरुणीची परीक्षा होती. त्यासाठी ती ग्राहक पेठ इथं उतरली. समोरच तिला आरोपी शंतनू दिसला. त्यामुळे ती घाबरली. त्यानं तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण, तरुणीनं त्याला आईशी बोलायला सांगितलं.
त्यानंतर ती दुसऱ्या मित्राच्या दुचाकीवरून परीक्षेला जायला निघाली. पण, शंतूनने तिचा हात पकडला. माझे ऐक नाहीतर तुला आज मारूनच टाकतो.. आज एकतरी मर्डर करतोच, अशी धमकी शंतनूने तिला दिली. त्याची धमकी ऐकताच तिचा मित्र गाडी थांबवून त्याला मारायला लागला. पण, शंतूनने बॅगेतून कोयता काढला आणि वार करू लागला. वार चुकवून तिचा मित्र पळून गेला. त्यानंतर त्यानं तरुणीवर वार केला. पण, MPSC चा अभ्यास करणारे विद्यार्थी त्या दिशेने धावले आणि त्यांनी तरुणीचा जीव वाचवला.
हे ही वाचा>> PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?
काही दिवसांपूर्वीच पुण्यात घडलेलं दर्शन पवार हत्याकांड आणि आता तरुणीवर कोयत्यानं वार. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदाशिव पेठेतील नेमकं काय घडलं होतं
तरुणीने बोलणं बंद केलं म्हणून तिच्याच वर्गमित्राने भर रस्त्यात तिच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ घडली होती. प्रेम प्रकरणातून तरुणाने हल्ला केल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं होतं.
हे ही वाचा>> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!
शंतनू जाधव असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरुन चालले असताना हल्लेखोर तरुणाने त्यांना थांबवले, काही क्षणातच त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. हल्ला झाल्यानंतर तरुणी जीव मुठीत घेऊन धावायला लागली. यावेळी आरोपी शंतनूने तिच्यावर डोक्यावर कोयत्याने वार केला. ज्यानंतर ती जमिनीवर कोसळली. सुरुवातीला तिच्या मदतीला कोणी आलं नाही. मात्र, त्यानंतर रस्तावरील काही नागरिक मुलीच्या दिशेने धावून आले. जखमी अवस्थेत मुलगी धावत असताना लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील हा तरुण त्या तरुणीच्या मदतीला आला. ज्यामुळे त्या तरुणीचा अगदी थोडक्यात जीव वाचला.
ADVERTISEMENT