अ‍ॅडल्ट वेबसाईटवर फोटो लीक करण्याची धमकी, ‘कला’ फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप

मुंबई तक

06 Apr 2023 (अपडेटेड: 06 Apr 2023, 01:59 PM)

Qala actress swastika mukherjee big allegation : बंगाली सिनेमा इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री आणि कला फेम स्वास्तिका मुखर्जीने (Swastika mukherjee)फिल्म प्रोड्यूसरवर गंभीर आरोप केले आहेत. फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे.

swastika mukherjee big allegation on film producer sandeep sarkar

swastika mukherjee big allegation on film producer sandeep sarkar

follow google news

Qala actress swastika mukherjee big allegation : बंगाली सिनेमा इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री आणि कला फेम स्वास्तिका मुखर्जीने (Swastika mukherjee) फिल्म प्रोड्यूसरवर गंभीर आरोप केले आहेत. फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. विशेष म्हणजे ज्या सिनेमाचे नुकतेच तिने शुटींग पुर्ण केले आहे,त्याच सिनेमाचा को प्रोड्युसर संदीप सरकार (sandeep sarkar) विरोधात तिने हे गंभीर आरोप केले आहेत. एवढ्यावरच अभिनेत्री थांबली नाही, तर तिने पोलीस ठाण्यात देखील तक्रार केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात. (qala actress swastika mukherjee big allegation on film producer sandeep sarkar)

हे वाचलं का?

स्वास्तिका मुखर्जी (Swastika mukherjee) सध्या तिच्या शिबपूर या अपकमिंग फिल्ममुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या रिलीजला अवघे काही दिवसच उरले आहेत. या रीलीजपुर्वीच स्वास्तिकाने को प्रोड्युसर संदीप सरकार विरोधात गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आरोप काय?

सिनेमाच्या शुटींग दरम्यान आम्ही भेटलो होतो.गेल्याच महिन्यात त्याने मला धमकीचे मेल पाठवले आहेत. संदीप सरकार तिच्या फोटोसोबत छेडछाड करून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप स्वास्तिकाने (Swastika mukherjee) केला आहे.

हे ही वाचा : आश्वासन देऊनही दिला नाही अवॉर्ड, मग सलमान खानने असा घेतला बदला

संदीप सरकारचा (sandeep sarkar) मित्र रवीश शर्माने हे मेल पाठवले आहेत. ज्यामध्ये त्याने स्वत:ला हॅकर म्हटले आहे. आणि तो माझे फोटो मॉर्फ करून अ‍ॅडल्ट साईटवर अपलोड करणार आहे. धमकीच्या ईमेल सोबत त्याने माझे फोटोही पाठवले होते. जे खुपच वाईट होते, असे स्वास्तिकाने (Swastika mukherjee) म्हटलेय.

को प्रोड्युरसचे असे देखील म्हणणे आहे की, तो अमेरीकेचा रहिवाशी आहे. त्यामुळे जर मी त्यांच्या टीमला सपोर्ट केला नाही तर, तो यूएस काऊसलेंटशी बोलेल आणि तिला कधीच अमेरीकेचा विजा मिळणार नाही, असे स्वास्तिकाने (Swastika mukherjee) सांगितले.

दरम्यान हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर मी सिनेमाचे प्रमोशनमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला. तसेच गोल्फ ग्रीन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अद्याप संदीप सरकारकडून (sandeep sarkar) कोणतीच प्रक्रिया समोर आली नाही आहे. स्वास्तिकाचे हे आरोप आता किती खरे आणि खोटे आहेत, हे आता लवकरच कळणार आहेत.

    follow whatsapp