Murder Case: राजस्थानमधील हनुमानगडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासमधील (Coaching class) विद्यार्थ्याबरोबर प्रेमसंबंध (relationship) जुळल्यानंतर त्याच्याच मित्राला सुपारी देऊन पतीची हत्या (Husband Murder) केल्याची खळबळजनक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या हत्येप्रकरणी आता पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Three accused arrested) केली आहे. प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने पतीच्या हत्येसाठी कोचिंग क्लासमधीलच प्रियकर (Boyfriend) असलेल्या विद्यार्थ्याच्या मित्रांनाच सुपारी देऊन ही हत्या केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या प्रेमाची ही कथा एकाद्या चित्रपटापेक्षाही काही कमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.(rajasthan coaching class teacher affair with student husband killed due to affair)
ADVERTISEMENT
झोपेच्या गोळ्या देऊन गळा दाबला
कोचिंग क्लासमधील शिक्षिकेने क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर आपले प्रेमसंबंध जुळवले होते. त्यानंतर त्याच्या मित्राला 50 हजारची सुपारी देऊन आपल्याच पतीची तिने हत्या घडवून आणली. दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तिने तेच दूध आपल्या पतीला प्यायला दिले होते. त्यानंतर तिने प्रियकरला आणि त्याच्या मित्राला घरी बोलवून त्यांनी प्रियकराच्या मित्राने तिच्या पतीची चाकूने वार आणि उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचे दाखवण्यासाठी पतीचा मृतदेह दोरीला लावून लटकवण्यात आला होता.
हे ही वाचा >> Crime: 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला, जागीच गेला जीव
क्लासमध्येच जुळले प्रेमसंबंध
या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असताना कोचिंग क्लासमधील शिक्षिका शिल्पा खेमकाचे क्लासला येणारा विद्यार्थी मोहम्मद शकीलवर ती प्रेम करत होती. मोहम्मद शकील हा फॉर्च्यून कोचिंग सेंटरमध्ये परदेशी शिक्षण घेण्यासाठी तो तयारी करत होता. त्यावेळी शिल्पा खेमका ही त्या क्लासवर ती रिसेप्शन ड्युटी करत होती. त्याचवेळी या दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या ती दोघं प्रेमात पडली होती. त्यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले.
अन् हत्येचा कट रचला
मृताची पत्नी शिल्पाने आपल्या प्रियकराच्या आणि त्याचा मित्र यादवेंद्रच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. पत्नी शिल्पा आणि तिच्या प्रियकराची नजर मृत सुनील खेमकांच्या संपत्तीवर आणि त्यांच्या पैशावर होती. त्यामुळे शिल्पा खेमकाने खूप पुढचा प्लॅन आखला होता. पतीची हत्या करुन ती प्रियकरासोबत परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होती असंही यावेली पोलिसांनी सांगितले.
पहिला प्लॅन फसला
शिल्पाचा बॉयफ्रेंड शकील परदेशी शिक्षणाची तयारी करत होता. त्यामुळे ही दोघंही गेल्या अनेक दिवसांपासून सुनील खेमकाच्या हत्येचा कट रचत होती. याआधीही या दोघांनी पूर्ण नियोजन करून त्यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र तो प्रयत्न सपल झाला नाही. त्यामुळे त्यानंतर आखलेला प्लॅन यशस्वी झाला आणि तिने पतीची हत्या केली. मात्र काही तासातच पोलिसांनी हत्येचा कट रचलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकर आणि त्याच्या दोस्ताना अटक केली.
हे ही वाचा >> Prakash Ambedkar: शरद पवार-आंबेडकरांची ‘चाय पे चर्चा’, बंद दाराआडची चर्चा अन्…
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दुधातून पतीला झोपेच्या गोळ्या देऊन झाल्यानंतर पतीची हत्या करण्यासाठी प्रियकरला आणि त्याच्या मित्राला तिने घरी बोलवून घेतले होते. यावेळी त्यांनी आधी गळा दाबला व नंतर त्यांची चाकूने हत्या केली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनीही 24 तासाच्या आत गुन्ह्याचा तपास करुन तीन आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT