RAW: ही आहे RAW एजंटची कहाणी, वाचून तुम्हीही जाल हादरून!

mumbaitak.web aajtak

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 07:35 PM)

Who is Vikas Yadav : खालिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी मोठे आरोप केले आहेत.

कोण आहे विकास यादव?

कोण आहे विकास यादव?

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाव C11, भारताच्या RAW चा एजंट?

point

खालिस्तानी अतिरेक्याच्या हत्येच्या कटाचं प्रकरण

point

FBI च्या रडारवर असलेला विकास यादव कोण?

Who is Vikas Yadav?: खालिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर अमिरेकेच्या तपासयंत्रणांनी मोठे आरोप केले आहेत. या भारतीय नागरिकाचं नाव आहे विकास यादव. यापूर्वी दाखल झालेल्या एका चार्जशीटमध्ये विकास यादवचा उल्लेख CC-1 असा करण्यात आला होता. गुरपतवंतसिंह पन्नूला भारताने अतिरेकी घोषिक केलेलं असून, त्याच्याकडे सध्या अमेरिकेचं नागरिकत्व आहे. अमेरिकेचे अॅटॉर्नी जनरल मेरिक बी गारलँड यांनी म्हटलं की, "अमेरिकेच्या नागरिकांना धोक्यात टाकण्याचे कोणतेच प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी  न्याय विभाग तत्पर आहे."  अर्थातच या भूमिकेमुळे अमेरिकेने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय. 

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय? 

फायनान्शियल टाइम्सने मागच्या वर्षी दिलेल्या एका वृत्तानुसार भारताने दहशतवादी घोषित केलेल्या पन्नूच्या हत्येचा कट हा अमेरिकेतच रचला गेला. मात्र तो तपासयंत्रणांनी हाणून पाडला. यानंतर अमेरिकेच्या न्याय विभागाने  याप्रकरणी न्यूयॉर्क जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये निखिल गुप्ता नावाच्या एका व्यक्तीवर पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप केला होता. निखिल गुप्ताला मागच्याच वर्षी चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अमेरिकेत आणण्यात आलं. निखिल गुप्ता सध्या तुरूंगात आहे.  

हत्येसाठी किलरला दिली होती सुपारी? 

हे ही वाचा >> Salman Khan Threat Message : 'सलमान'ला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?

एका भारतीय अधिकाऱ्याने निखिल गुप्ताला पन्नूच्या हत्येसाठी सुपारी दिली होती असंही त्या खटल्यातून समोर आलं होतं. त्यानंतर गुप्ताने एका शार्पशूटरला या कामाची जबाबदारी दिली, मात्र इथेच ट्वीस्ट आला. कारण निखिल गुप्ताने ज्या व्यक्तीला पन्नूच्या हत्येची सुपारी दिली, ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा एजंट होता. दरम्यान, या हत्येसाठी त्याला निखिल गुप्ताकडून एक लाख डॉलरची सुपारीही दिली होती. यातले 15 हजार डॉलर आगाऊ देण्यात आले होते.

दरम्यान, नुकताच याचिकाकर्त्यांनी खालिस्तानी अतिरेकी पन्नूच्या हत्येच्या अयशस्वी कटाच्या प्रकरणात एक मोठा खुलासा करत विकास यादव या व्यक्तीचं नाव जाहीर केलंय. विकास यादववर मर्डर फॉर हायर, मनी लॉन्ड्रींगचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच न्युयॉर्कच्या एका दुसऱ्या न्यायालयातील खटल्यात विकास यादवचा साथीदार असा उल्लेख करत निखिल गुप्तावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व धागे जुळून येत असताना विकास यादव हा सध्या रडारवर आहे.

हे ही वाचा >>Evm Voting: 'पेजर हॅक होऊ शकतं, मग EVM...?', निवडणूक आयुक्तांनी दिलं 'हे' उत्तर

पन्नूच्या हत्येच्या कटाचा थेट संबंध खालिस्तानी अतिरेकी हरदीप निज्जरच्या हत्येशी जोडण्यात आलाय. 18 जूनला कॅनडातील गुरू नानक सिख गुरूद्वाराबाहेर निज्जरच्या हत्येनंतर अगदी काळी तासांनंतर CC1 (विकास यादव) याने निखाल गुप्ताना निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ पाठवला होता. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुणी बनवलाहोता हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. 

या प्रकरणात अमेरिकेच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी असंही म्हटलंय की, विकास यादव हा यापूर्वी भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ (RAW) साठी काम करत होता. विकास यादवनेच या कटात अमानत हे नाव वापरलं. दरम्यान, विकास यादवचा फोटो FBI कडून WANTED म्हणून जाहीर करण्यात आलाय. तर या फोटोमध्ये विकास यादव हा हरियाणातील प्राणपुऱ्याचा असल्याचं म्हटलंय. तर भारताने आता संबंधीत व्यक्ती आमच्यासाठी काम करत नाहीत असं स्पष्ट केलंय. 
 

    follow whatsapp