Baba Siddique : बाबा सिद्दीकींनंतर 'हा' अभिनेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?

मुंबई तक

16 Oct 2024 (अपडेटेड: 16 Oct 2024, 06:58 PM)

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या तुरुंगात बंद आहे. मात्र असे असून त्याचे सहकारी त्याची गँग चालवत आहेत. यामध्ये त्याचा भाऊ आणि मित्र गोल्डी ब्रारचा समावेश आहे. त्याचसोबत युकेमध्ये असणारा रोहित गोदार याने बिश्नोई गँगसाठी मुनव्वर फारूकीला जीवे मारल्याचा कट रचल्याचं तपासात निष्पण्ण झालं आहे.

 baba siqqque case update lawrence bishnoi gang target munawar faruqui rohit godar

'या' अभिनेत्याचा बिश्नोई गँग करणार होती गेम?

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकीनंतर 'या' अभिनेत्याच्या हत्येचा कट

point

पण त्या कारणामुळे कट उधळला

point

पोलीस चौकशीतून खळबळनजक बाब समोर

Munawar Fariqui News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हत्येची जबाबदारी एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अटकेत आलेल्या आरोपींवरून या हत्येत बिश्नोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यानंतर आता मुंबईतला प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा बिश्नोई गँगच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत घडलेल्या नादीर शाह हत्येच्या तपासादरम्यान या गोष्टीचा खुलासा झाला आहे. (baba siqqque case update lawrence bishnoi gang target munawar faruqui rohit godar) 

हे वाचलं का?

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या तुरुंगात बंद आहे. मात्र असे असून त्याचे सहकारी त्याची गँग चालवत आहेत. यामध्ये त्याचा भाऊ आणि मित्र गोल्डी ब्रारचा समावेश आहे. त्याचसोबत युकेमध्ये असणारा रोहित गोदार याने बिश्नोई गँगसाठी मुनव्वर फारूकीला जीवे मारल्याचा कट रचल्याचं तपासात निष्पण्ण झालं आहे. रोहितने दिल्लीतील दोन मारेकऱ्यांना फारूकीच्या हत्येची सूपारी दिली होती. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातल वृत्त दिलं आहे. 

हे ही वाचा : Lawrence Bishnoi: दाऊदचाच पॅटर्न, बाबा सिद्दीकींची सुपारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

13 सप्टेंबर 2024 रोजी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश 1 भागात अफगाणी जिम मालकाची हत्या करण्यात आली होती.या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका शूटरला अटक केली होती. या शूटरला रोहित गोदारने गँगमध्ये सामावून घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच महिन्यात अफगाण नागरीक नादिर शाह याच्या हत्येनंतर 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीत या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे समोर आले होते. या चौकशीत मुनव्वर फारूकी बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर असल्याचा खुलासा झाला होता. 
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नादिर शाह हत्या प्रकरणातील आरोपींची चौकशी सूरू असताना आरोपींनी न्यू फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलची रेकी केली होती, परंतु त्यांना त्यावेळी त्यांचं टार्गेट कोण होतं? हे माहिती नव्हतं. ही माहिती मिळाल्यानंतर केंद्रिय गुप्तचर यंत्रणांनी याबाबची माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस तपासासाठी त्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत पोहोचलं होतं. त्यावेळी हॉटेलच्या गेस्ट लिस्टमध्ये मुनव्वर फारूकीचे नाव होते. त्यावेळी फारूकी दिल्लीमध्ये एंटरटेनर्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी फारूकीची भेट घेऊन त्याला या संपूर्ण घटनेची कल्पना दिली होती.त्यानंतर फारूकी मुंबईला रवाना झाला होता. 

हे ही वाचा : Baba Siddique : सलमान खान नाही...'या' कारणासाठी झाली सिद्दीकींची हत्या, Inside Story

तसेच पोलिस चौकशी दरम्यान, शूटरने दावा केला की रोहित गोदराने त्याला फोन केला आणि मुनव्वर फारुकीला संपवण्यास सांगितले. या कारणास्तव त्यांनी हॉटेलची रेकी केली होती. पण त्यांना त्यांचे टार्गेट सापडले नव्हते. त्यामुळे सिद्दीकी आधी मुनव्वर फारूकी बिश्नोई गँगच्या टार्गेटवर होता. 

    follow whatsapp