Lawrence Bishnoi: दाऊदचाच पॅटर्न, बाबा सिद्दीकींची सुपारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

मुंबई तक

16 Oct 2024 (अपडेटेड: 16 Oct 2024, 05:10 PM)

Lawrence Bishnoi Vs Dawood: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण तो आता कुख्यात डॉन दाऊदला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.

लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा आला चर्चेत

point

लॉरेन्स बिश्नोईचा नवा पॅटर्न आहे तरी काय?

point

दाऊद इब्राहिमसारखीच बिश्नोई देखील पसरवतोय दहशत?

Lawrence Bishnoi Pattern: मुंबई: महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर आता लॉरेन्स बिश्नोईबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. गुन्हेगारी जगतात आपला जम वाढवत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला आता बॉलिवूडवरही दबदबा निर्माण करायचा असल्याचं दिसतंय. सलमान खानला धमकी देणं, सलीम खान यांना धमकावणं, सलमानच्या घरावर फायरिंग करणं आणि थेट सलमानचे निकटवर्तीय आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींची हत्या, यामुळे आता लॉरेन्सच्या या पॅटर्नची तुलना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी केली जात आहे. (dawood like pattern network spread across 12 states task management from jail is lawrence bishnoi also setting up a gang like d company)

हे वाचलं का?

बाबा सिद्दिकी यांची मुंबईत भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अगदी याच पद्धतीनं 90 च्या दशकात दाऊदच्या टोळीचं काम चालायचं. निशाण्यावर असलेल्या व्यक्तीला थेट घराजवळ आणि समोरासमोर गोळीबार करून संपवण्याचा हा पॅटर्न दाऊदसारखाच असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता लॉरेन्सलाही दाऊदसारखीच दहशत निर्माण करायची असल्याचं दिसतंय.

हे ही वाचा>> Baba Siddique : बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्यांची सगळी कुंडलीच आली बाहेर, एक तर भंगारवाला...

कधीकाळी चोरीमारी, धमक्या देणं, लूटमार करण्यासारख्या गुन्ह्यांमधून दाऊद इब्राहीमने गुन्हेगारी जगतावर एकहाती सत्ता निर्माण केली. अगदी तसंच लॉरेन्सनेही धमक्या आणि मारहाण करत गुन्हेगारी जगतात एन्ट्री केली. दाऊदने छोटा राजन आणि अन्य काही साथीदारांच्या मदतीने 500 पेक्षा जास्त गुंडांची गँग बनवली होती. तर इकडे लॉरेन्सनेही आता कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारसोबत हातमिळवणी करत दहशतीचा नवा पॅटर्न तयार केला. 

ज्यामध्ये 700 पेक्षा जास्त गुंडांची लॉरेन्सला साथ असल्याचं दिसतंय. दाऊदनेही खंडणीच्या माध्यमातून सर्वात जास्त पैसा कमावला होता, तोच आता लॉरेन्सही खंडणीतूनच आपलं बॅलेन्स वाढवताना दिसतोय.

हे ही वाचा>> Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी हत्येबाबत प्रचंड मोठा खुलासा, नवी माहिती आली समोर...

लॉरेन्सचं नेटवर्क दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. आतापर्यंत समोर आलेल्या घटनांमधून तब्बल 12 राज्यांमध्ये लॉरेन्सने आपलं जाळं तयार केलंय. ज्या पद्धतीनं लॉरेन्सने सलमान खानशी असलेल्या मैत्रीवरुन बाबा सिद्दिकींना संपवलं, हे पाहता लॉरेन्सला आता मुंबईला आपला गड बनवण्यासाठी लॉरेन्सही दाऊदसारखेच प्रयत्न करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणंही दहशत निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.

दाऊद गँग कमजोर, लॉरेन्ससाठी रस्ता मोकळा?

मुंबईत दाऊद गँग मागच्या काही दिवसात कमजोर पडत असल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्यानंतर मुंबईत खंडणीच्या प्रकरणांमध्येही पुरती घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत लॉरेन्स आपलं जाळं मजबूत करून मुंबईवर सत्ता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. याचसाठी त्याने सलमानला टार्गेट करून भीती निर्माण करण्याचा चंग बांधलाय. 

लॉरेन्सला राजकीय पाठबळ? 

दाऊद इब्राहीमला राजकीय पाठिंबा मिळाल्याचं काही घटनांमधून समोर आलं होतं. तसे आरोपही अनेकदा झाले. त्याच पद्धतीने आता लॉरेन्सलाही राजकीय मंडळींचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जातंय.

    follow whatsapp