Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे 'YouTube' कनेक्शन! मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

मुंबई तक

16 Oct 2024 (अपडेटेड: 16 Oct 2024, 02:19 PM)

Baba Siddique Murder Latest News Update :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे.

Baba Siddique Murder Latest News

Baba Siddique Murder Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेबाबत पोलिसांनी केला मोठा खुलासा

point

बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी शूटर्सला रसद कुणी पुरवली?

point

बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेत मोठा ट्वीस्ट?

Baba Siddique Murder Latest News Update :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यपला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी युट्यूबच्या माध्यमातून फायरिंगचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. 

हे वाचलं का?

बाबा सिद्दीकींवर शुटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी 6 राऊंड फायर केले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत काही तासांतच या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या संशयास्पद शूटर्सने वांद्र्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दहावेळा बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना यात यश आलं नाही." बाबा सिद्दीकींची त्यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ खुल्या परिसरात हत्या करावी, असं शूटर्सला सांगण्यात आलं होतं", अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा

शूटर्सला बाबा सिद्दीकींवर ओपन फायर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली नव्हती. सिद्दीकींच्या आसपास त्यांचे समर्थक असल्याने त्यांचा प्लॅन फेल जाण्याची शक्यता होती, अशीही माहिती समोर आलीय.दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौथ्या संशयास्पद आरोपीला अटक केली आहे. हरिशकुमार बालाक्रम (उत्तर प्रदेश) असं या आरोपीचं नाव आहे.

शूटर्सला रसद देऊन हत्येचा कट रचण्यात सहकार्य केल्याच्या आरोपाखाली हरिशकुमारला अटक करण्यात आली आहे. आरोपी हरिशकुमार 23 वर्षांचा असून तो पुण्यात भंगार विक्रीचा धंदा करायचा. पोलिसांनी गुरमेल बलजित सिंग (23), धर्मराज कश्यप (19), प्रविण लोणकर (पुणे) यांच्यावरही अटकेची कारवाई केली आहे.

    follow whatsapp