Crime: सिनेस्टाईलने नर्सचा खून! 2 सरकारी कर्मचारी गजाआड, कारण जाणून धक्काच बसेल

मुंबई तक

05 Sep 2024 (अपडेटेड: 05 Sep 2024, 01:14 PM)

Nurse Murder Crime: जळगावात सेवानिवृत्त परिचारीकेच्या खूनाच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 30 लाख रुपयांसाठी स्नेहलता अनंत चुंबळे (60) या सेवानिवृत्त परिचारिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.

jalgaon Nurse Murder Case

jalgaon Nurse Murder Case

follow google news

बातम्या हायलाइट

point

६० वर्षीय सेवनिवृत्त परिचारिकेच्या खूनामुळं जळगावात खळबळ

point

पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना घेतलं ताब्यात

point

परिचारिकेच्या खून प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांनी नेमकं काय केलं?

Nurse Murder Crime: जळगावात सेवानिवृत्त परिचारीकेच्या खूनाच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 30 लाख रुपयांसाठी स्नेहलता अनंत चुंबळे (60) या सेवानिवृत्त परिचारिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगराव निकम अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहलता चुंबळे जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून काम करत होत्या. आरोग्य विभागातच लिपिक असलेल्या जिजाबराव याच्याशी त्यांची ओळख होती. एप्रिल 2023 मध्ये निवृत्त झाल्यानंतर स्नेहलता मुलाकडे नाशिकला राहत होत्या. 17 ऑगस्ट रोजी त्या सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या बैठकीसाठी जळगावात आल्या होत्या.

हे ही वाचा >> Today Gold Price : ग्राहकांसाठी 'सुवर्ण' संधी? गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या भावात झाले मोठे बदल 

...म्हणून बँकेतून 30 लाख रुपये काढले

नाशिकला फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांनी याच काळात बँकेतून 30 लाख रुपये काढले. नंतर 20 ऑगस्टला त्या नाशिकला परत येणार होत्या. पण त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली. पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा पैसे काढतांना जिजाबराव त्यांच्या सोबत दिसला. नंतर कॉल डिटेल्समध्ये जिजाबराव आणि त्याचा मित्र विजय निकम एकमेकांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं. दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना खाकीचा दणका दाखवला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दिलीय. 

हे ही वाचा >> Mahrashtra Weather Today : राज्यात कोसळल्या सरी! जाणून घ्या पावसाची आजची स्थिती

30 लाख रुपयांसाठी स्नेहलता अनंत चुंबळे या सेवानिवृत्त परिचारिकेचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे आरोपी सरकारी कर्मचारी असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगराव निकम अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. 

    follow whatsapp