Satara Crime : जामिनावर बाहेर आला..., अल्पवयीन मुलीला कळताच संपवलं जीवन; साताऱ्यात काय घडलं?

इम्तियाज मुजावर

• 06:59 PM • 25 Aug 2024

Satara Crime News : साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरूणीने याआधी या तरूणावर गुन्हा देखील दाखल केला होता. या घटनेनंतर तरूणाला अटक झाली होती. या अटकेनंतर जामीनावर सूटका झाल्यानंतर तरूणाने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरूवात केली होती.

satara crime news girl commit suicide due to young boy harrass shocking crime story

साताऱ्यात तरूणाच्या जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या

follow google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यात तरूणाच्या जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या

point

घटनेनंतर स्थानिक नागरीकांचा रास्ता रोको

point

या घटनेनंतर तरूणाला अटक झाली होती.

Satara Crime News : बदलापूरमध्ये (Badlapur) दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या घटनेनंतर एका मागून एक बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आता साताऱ्यात तरूणाच्या जाचाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी रास्ता रोको करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी (Police) कुटुंबियांना समजावून हा रास्ता रोको मागे घ्यायला लावला होता. (satara crime news girl commit suicide due to young boy harrass shocking crime story) 

हे वाचलं का?

साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरूणीने याआधी या तरूणावर गुन्हा देखील दाखल केला होता. या घटनेनंतर तरूणाला अटक झाली होती. या अटकेनंतर जामीनावर सूटका झाल्यानंतर तरूणाने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरूवात केली होती. याच त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेत पोलिसात तक्रार करून देखील मुलीचा जीव वाचवता आला नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरीक चांगलेच आक्रमक झाले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय, तरी 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

मुलीच्या आत्महत्येचा घटनेनंतर स्थानिकांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावरील रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी तरूणावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस आणि नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली.मात्र पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून घेतली. 

दरम्यान काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिंचा घरातल्या लोकांना धमकी दिली होती. या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेनंतर स्थानिकांमधून संताप व्यक्त होतं आहे. 

हे ही वाचा : Lakhapati Didi Yojana : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, 'लखपती दीदी' योजना नेमकी काय?

अल्पवयीन मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
 

    follow whatsapp