Saurabh Rajput Murder : पतीचा खून करणारी मुस्कान झाली प्रेग्नेंट? प्रियकर साहिलसोबत लग्न केलं आणि...

Saurabh Rajput Murder Case : मेरठमध्ये झालेल्या सौरभ शुक्लाच्या हत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. सौरभची हत्या त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर साहिलने केली.

Saurabh Rajput Murder Case Latest Update

Saurabh Rajput Murder Case Latest Update

मुंबई तक

24 Mar 2025 (अपडेटेड: 25 Mar 2025, 01:33 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट आली समोर

point

आरोपी मुस्कान रस्तोगिची होणार प्रेग्नन्सी टेस्ट?

point

लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलं नाही

Saurabh Rajput Murder Case : मेरठमध्ये झालेल्या सौरभ शुक्लाच्या हत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. सौरभची हत्या त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर साहिलने केली. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर जेलमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेलमध्ये मुस्कानला भेटायला तिच्या कुटुंबातील कोणीही येत नसल्याचं समजते. केस लढण्यात तिची कोणीही मदत करणार नाही, असं मुस्कानला वाटतंय. केस लढवण्यासाठी मुस्कानने जेल प्रशासनाकडे सरकारी वकीलाची मागणी केली आहे, अशीही माहिती समोर आलीय. तसच मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्लानेही सरकारी वकिलाची मागणी केलीय. मुस्कान आणि साहिलने जेल प्रशासनाला प्रार्थना पत्रही दिलं आहे.

हे वाचलं का?

मुस्कानची होणार प्रेग्नन्सी टेस्ट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मुस्कानच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. साहिल आणि मुस्कान जेव्हापासून जेलमध्ये आहेत, तेव्हापासून त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन करता आलं नाही. जेलमध्ये त्यांना कोणतेही व्यसनयुक्त गोष्टी मिळत नाहीयत. अशातच त्यांचं आरोग्य खराब होत असल्याचं बोललं जात आहे. जेल प्रशासनाकडून दोन्ही आरोपींचं समुपदेशन केलं जात आहे. आता दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

हे ही वाचा >> VIDEO: शिंदे गटाचा आपसातच राडा, महिलेने शिंदेंच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात बेदम चोपलं!

सच जेलमध्ये मुस्कानची प्रेग्नन्सी टेस्टही केली जाऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. सौरभ राजपूतचा खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचलमध्ये फिरायला गेले होते. तिथे त्यांनी मंदिरात लग्न केलं होतं आणि तिथेच हनिमूनचा प्लॅनही केला होता. अशातच जेल प्रशासन मुस्कानची प्रेग्नन्सी टेस्टही करू शकतात. 

लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलं नाही

जेल प्रशासनाच्या नियमांनुसार, दोन्ही आरोपी जेलमध्ये वेगवेगळे राहत आहेत. जेलमध्ये पती पत्नीला भेटण्याची परवानगी असते. पण मुस्कान आणि साहिलने त्यांच्या लग्नाचं कोणतंही प्रमाणपत्र दिलेलं नाही. जर त्यांनी लग्नाचं प्रमाणपत्र दाखल केलं, तर जेलच्या नियमांनुसार त्यांची आपआपसात भेट होऊ शकते. मुस्कान आणि साहिलची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीही केली जात आहे.

हे ही वाचा >> पुण्यात भीषण अपघात! कंटेनरने स्विफ्टला मारली जोरदार धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

 जेव्हापासून मुस्कान जेलमध्ये आहे, तेव्हापासून आतापर्यंत मुस्कानने तिच्या मुलीची आठवणही काढली नाहीय. सुरुवातीला ती खूप शांत होती. पण आता तिने थोडंफार बोलण्यास सुरुवात केलीय. दोघांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आतापर्यंत त्यांना भेटला नाहीय. मुस्कानने तिचा प्रेमी साहिलची मदत घेत सौरभ राजपूतचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट टाकलं होतं. 

    follow whatsapp