Crime news in marathi : एक खळबळजनक घटना समोर आलीये. या घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसही हादरले. एका महिलेने नोकराचा प्रायव्हेट पार्टच चाकूने कापून टाकला. जखमी झालेल्या नोकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (mistress cut private part of Servant, who tried to rape)
ADVERTISEMENT
ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात. एका महिलेने तिच्या नोकरावर घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वसंरक्षणार्थ तिने चाकूने नोकराचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि तो त्याच्या शरीरापासून वेगळा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्यांना रक्ताने माखलेली गादी आणि बेडशीट आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून घटनेत वापरलेला चाकू जप्त केला आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडित महिलेने तिचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
मालकीण आणि नोकरामध्ये काय घडलं?
हे संपूर्ण प्रकरण मंझनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शरीफपूर गावचे आहे. तिथे राहणाऱ्या महिलेचा नवरा सौदी अरेबियात ड्रायव्हर म्हणून काम करतो. घरी कोणी नसताना नोकराने संधी साधून दुपारी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. नोकर अचानक घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला.
वाचा >> हनुवटीवर रायफल ठेवून दाबला ट्रिगर, सोलापुरात पोलीस कॉस्टेबलने का केली आत्महत्या?
महिला स्वयंपाकघर बंद करण्याच्या बहाण्याने गेली आणि तेथून चाकू आणला. नोकराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच चाकूने तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. चाकूने जखमी झालेला नोकर कसा तरी घटनास्थळावरून फरार झाला.
येथे महिलेने थेट पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेची माहिती दिली. हे ऐकून पोलिसही हादरले. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
हे ही वाचा >> नाना पाटेकरांनी चाहत्याला का मारलं? खरं कारण आलं समोर
मात्र, जखमी नोकराच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. महिलेविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकराने काय सांगितले…
23 वर्षीय नोकराने सांगितले की, तो लहानपणापासून महिलेच्या घरी काम करतो. घटनेच्या दिवशी महिलेने मला तिच्याकडे बोलावले होते. नंतर तोंडावर रुमाल ठेवून त्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला. शुद्धीवर आल्यावर त्याला कळले की त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला आहे. कसा तरी तो त्याच्या घरी पोहोचला. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महिलेचा दावा काय?
घरी एकटी होते असे महिलेने सांगितले. मुलगा (नोकर) हसत घरात आला. तो माझा हात धरून मला खोलीत घेऊन जाऊ लागला. मी त्याला माझा हात सोडण्यास सांगितल्यावर त्याने जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. मी किचनमधून येते असं सांगितलं. त्यानंतर मी चाकू घेऊन त्याच्याकडे गेले. जबरदस्ती करू लागला. तो ऐकत नसल्याने चाकूने हल्ला केला.
पोलीस काय म्हणाले?
याप्रकरणी डीएसपी मंझनपूर अभिषेक सिंह यांनी सांगितले की, शरीफपूरमध्ये एका मुलाचा शेजारच्या महिलेसोबत वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ज्यामध्ये महिलेने मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून त्यांना प्रयागराज येथे पाठवण्यात आले.
जखमी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला ताब्यात घेऊन चाकू जप्त करण्यात आला. त्याची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT