Crime Story: स्वप्नात तरूणाकडे मृतदेहाने मागितली मदत अन्... मानवी सापळ्याचे भयानक गूढ!

मुंबई तक

• 04:52 PM • 23 Sep 2024

Ratnagiri Crime Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील आजगाव इथे राहणाऱ्या एका 30 वर्षांच्या योगेश आर्या या व्यक्तीच्या स्वप्नात एक मृतदेह येत होता. योगेशच्या म्हणण्यानुसार हा मृतदेह  त्याच्याकडे मदत मागत होता.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या योगेश आर्या या व्यक्तीच्या स्वप्नात एक मृतदेह येत होता

point

योगेशच्या म्हणण्यानुसार हा मृतदेह  त्याच्याकडे मदत मागत होता

point

पोलिसांनी योगेशने सांगितलेल्या जागेवर तपास कऱण्याचा निर्णय घेतला

Crime Story : रत्नागिरी : ‘माझ्या स्वप्नात मृतदेह येतो आणि डोंगरात माझा मृतदेह आहे असं सांगतो’ अशी कहाणी एका तरुणाने पोलिसांकडे जाऊन सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घडलं ते भयानकच होतं. त्यांना आढळला एक लटकलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडा... ही कहाणी एखाद्या सस्पेन्स चित्रपटाची वाटावी अशीच आहे. काहींना ऐकून विनोद वाटेल, काहींना भीती वाटेल. पण गूढ वाटेल अशी ही क्राईम स्टोरी आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (sindhudurga 30 years yogesh aarya had a dream of calling for help by a dead body from khed bhoste ghat in ratnagiri location)

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील आजगाव इथे राहणाऱ्या एका 30 वर्षांच्या योगेश आर्या या व्यक्तीच्या स्वप्नात एक मृतदेह येत होता. योगेशच्या म्हणण्यानुसार हा मृतदेह  त्याच्याकडे मदत मागत होता. या तरुणाच्या इंस्टाग्राम अकाउंटनुसार दररोज येणाऱ्या या स्वप्नाची शाहनिशा करण्यासाठी योगेश खरोखरच मृतदेह आहे का हे शोधण्यासाठी भोस्ते घाटात देखील गेला होता. योगेशच्या इन्स्टा अकाउंटवर आजही तो व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये योगेशने 'माझ्या स्वप्नात दिसणारी व्यक्ती मला इथे भेटेल अशी अपेक्षा आहे' असं म्हणताना दिसत आहे. त्या व्यक्तीच्या शोधात तो गेला होता पण तिथे त्याला काय यश आलं नाही. त्यानंतर योगेशने थेट पोलीस स्टेशनच गाठलं.

हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या किंमतींचा बाजारात नुसता धुरळा! बघूनच उडेल झोप; 1 तोळ्याचा भाव किती?

पोलीसांनाही सुरुवातीला योगेशच्या स्वप्नाबाबत किंवा जंगलात योगेश कोणाला तरी शोधायला गेलाय याबाबतची माहिती ही व्हिडीओतून मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने याबद्दलची तपासणी सुरू केली. अनेक पथकं पाठवण्यात आली. पण त्यांना हा व्हिडीओ इन्स्टा अकाउंटवर असल्याचं आढळलं. तेव्हा पोलिसांनी तो विषय सोडून दिला. 

त्यानंतर योगेश 17 सप्टेंबरला ‘स्वप्नात आलेल्या व्यक्तीने मदतीची मागणी करत लोकेशन सांगितलं’ असा दावा करत योगेश आर्या रत्नागिरीतील खेड पोलिसात गेला. ''मला वारंवार स्वप्नं पडतात. खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह आहे. तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं सांगतो' असं त्याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांना योगेशला काहीतरी मानसिक त्रास असेल असं वाटत होतं.  

कसं ते माहित नाही पण खेड पोलिसांनी योगेशच्या या बोलण्यावरुन आधी FIR नोंदवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी नुसता FIR नोंदवला नाही तर योगेश सांगत असलेल्या ठिकाणाची तपासणी सुरू केली. या तपासणी दरम्यान पोलीसांना एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जिथून वास येत होता त्या दिशेने जाऊन तपासणी कऱण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्टया बांधत त्याला टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह खाली पडलेला आढळला. 

हेही वाचा : Miss Universe India 2024: गुजरातची 18 वर्षीय सुंदरी बनली 'मिस युनिव्हर्स इंडिया'! कोण आहे रिया सिंघा?

राखाडी रंगाचं जॅकेट, राखाडी रंगाची पँट अशा पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचं दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची एक सॅक सापडली. मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपरांजवळ काळ्या रंगाचे बूट सापडले होते. मात्र याव्यतिरिक्त पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे पोलिसांना मृतदेहाशेजारी सापडलेल्या सॅकमध्ये सापडले नाहीत. त्यामुळे व्यक्ती कोण आहे? त्याने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही. खेड पोलीस सध्या याच बाबींचा तपास करत आहेत. पण मृतदेहाची अवस्था पाहता त्या व्यक्तीचा मृत्यू बरेच दिवसांपूर्वी झाला असावा असं दिसतंय. याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय आणि पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करताहेत, शोध घेताहेत. 

योगेश आर्याला पडलेल्या स्वप्नामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा सापळा सापडला.  योगेशच्या त्या गूढ स्वप्नाचं कोडं उलगडलं खरं. पण आणखीन अनेक गूढ प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.

    follow whatsapp