Solapur: पोलीस अधिकाऱ्याने डोक्यातच गोळी झाडून घेतली, असं काय घडलं?

मुंबई तक

07 Oct 2023 (अपडेटेड: 07 Oct 2023, 08:52 AM)

नांदेडमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सोलापूरातील आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांची आत्महत्या ही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

solapur suicide assistant police inspector working nanded committed suicide by shooting himself revolver

solapur suicide assistant police inspector working nanded committed suicide by shooting himself revolver

follow google news

Solapur Suicide: कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने (Assistant Inspector of Police) टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचे (Suicide) पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्याभरापासून आजारी रजेवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले (API Anand Malale) यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले. ही घटना आनंद मळाले यांच्या घराच्या अंगणामध्ये पहाटे चारच्या सुमारास घडली. सहाय्यक पोलीस निरक्षकाने आत्महत्या केल्याने आता कुटुंबीयांनी वरिष्ठांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

हे वाचलं का?

आजारी असल्याने रजा

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ज्या आनंद मळाळे हे नांदेड येथे कार्यरत होते. मात्र त्यांची तब्बेत बरी नसल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे आजारी रजेवर सोलापूरातील घराकडे होते. मात्र त्यांनी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत स्वतःकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले.

हे ही वाचा >> शेतकऱ्यांचा रोष! अजित पवारांच्या ताफ्यासमोर नेमकं घडलं काय?

अंगणात येऊन शेवट

आनंद मळाळे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचा घरात शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. म्हणू त्यांनी घराबाहेर येत शोध घेतला तेव्हा मळाले मृतास्थेत पडले होते.

अधिकाऱ्यांची घराकडे धाव

सहाय्य पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

कुटुंबाला मानसिक धक्का

या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा >> Asian Games: चीनच्या भूमीत भारताचा इतिहास! सुवर्ण पदकांची केली लयलूट

कष्टातून मिळवले होते पद

आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.खात्याअंतर्गत परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले.त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे.पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आनंद मळाळे यांनी आपले जीवन संपले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

    follow whatsapp