Bihar Crime : नात्याच्या मर्यादा ओलांडून प्रेम करणं एका विवाहित प्रेमवीराला प्रचंड महागात पडले आहे. बिहारमधील जमुईमध्ये (Bihar Jamui) एका व्यक्तीचा जीव त्याच्याच मामे सासूवर जीव जडला. तर दुसरीकडे त्या सासूचंही जावयावर प्रेम जडलं होतं. दोघांचं एकमेकांवर प्रेम बसल्यामुळे त्या दोघांमध्ये भेटीगाठी नंतर सुरू झाल्या. या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्या नकळत अनेकदा दोघं एकमेकांना भेटू लागली होती.
ADVERTISEMENT
प्रेमाची खबरबात पत्नीपर्यंत गेली
जावय आणि सासू कधी दिवसा तर कधी रात्री भेटू लागले. मात्र हे प्रकरण जास्त दिवस त्यांचे लपून राहिले नाही. तरुणाच्या पत्नीला त्यांच्या प्रेमाची माहिती समजली आणि तिने या गोष्टीची माहिती आपल्या घरात दिली. त्या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे तरुणाच्या पत्नीचे सगळेच नातेवाईक रागवले होते, त्यातच गावातील लोकंही त्यांच्याबद्दल रागात होते, आणि त्यामुळेच तरुणाला अद्दल घडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मग तरुणाला त्यांनी बेदम मारहाण केली.
हे ही वाचा >> Lok sabha Security : अमोल शिंदेसह तिघं चांगलेच फसले, दाखल झाला UAPA!
सासूवरचं जडलं प्रेम
बिहारमधील लक्ष्मीपूर परिसरातील कलागावमध्ये ही घटना घडली आहे. गावातील लोकांनी या प्रकरणातील सुनील कुमार यादवला आपल्या प्रेयसीबरोबर अश्लील चाळे करताना पकडले. त्यावेळी त्याला मारहाणही करण्यात आली. मात्र सगळ्यांना एका गोष्टीचा मोठा धक्का बसला तो म्हणजे सुनीलची प्रेयसी दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्याचीच मामे सासू होती. या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी त्याच्या बायकोला दिली. त्यानंतर बायको तिथं पोहचल्यावर तिने नवऱ्याला मारहाण केली. त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला झाडाल बांधले आणि चप्पलने त्याला मारहाण करायला सुरुवात केली.
चप्पल आणि बुटाने हाणलं
या प्रकरणातील सुनीलला तीन मुलं आहेत, तरीही त्याने चुलत सासूबरोबर आपले प्रेमसंबंध जुळवले होते. बुधवारी रात्री त्याच्या त्याच प्रेयसीला भेटण्यासाठी बगमाहून काळागावात पोहोचला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्या दोघांनाही अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले. ही घटना तिथं समजताच अचानक अनेक लोक तिथे जमा झाले. त्यानंतर या घटनेची माहिती सुनीलच्या पत्नीला देण्यात आली. त्यावेळी रागाच्या भरात पत्नीनेही त्याला मारहाण केली. ही सुनीलला मारहाण करत असतानाच काही लोकांनी त्या घटनेचा व्हिडीओही बनवण्यात आला.
पोलिसांपर्यंत गेला व्हायरल व्हिडीओ
सासूबरोबरचे प्रेमसंबंध असल्याचे कळाल्यावर आणि त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर सुनीलच्या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला. या घटनेची माहिती ना गाववाल्यांना माहिती होती, ना मार खाल्लेल्या युवकाला होती, मात्र या घटनेची माहिती व्हिडीओतून पोलिसांना मिळाली. त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची माहिती पोलिसांनी घेऊन त्याचा तपास सुरू केला. त्यामुळे हा व्हिडीओ आता सायबर टीमकडून देऊन त्या घटनेचा तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षकांनी दिल्या आहेत.
ADVERTISEMENT