Vanraj Andekar Murder Inside Story: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची अज्ञातांनी भर चौकात गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर कोयत्यानेही वार केले. ही धक्कादायक घटना नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेत आंदेकरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने आंदेकरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन संशयीत आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. (Former NCP corporator Vanraj Andekar was shot dead by unknown persons in Bhar Chowk. The assailants also stabbed Vanraj with a coyote)
ADVERTISEMENT
25 वर्ष पुण्याच्या आंदेकर टोळीची दहशत
पुण्यात गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. पण पुण्याच्या मध्यवर्ती भागात गेली २५ वर्ष आंदेकर टोळीची दहशत होती. वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर या टोळीचा म्होरक्या होता. 1995 पासून खून, खुनाचा प्रयत्न, धमक्या देणे, अशाप्रकारचे गंभीर गुन्हे सूर्यकांत आंदेकर यांच्यावर फरसानखाना, खडक, समर्थ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. माळवदकर गँगचा प्रमोद माळवदकर या गुंडाची हत्या काही वर्षांपूर्वी झाली होती. या प्रकरणात सुर्यकांत आंदेकरचं नाव उघड झालं होतं. वनराज आंदेकरांचं कोणत्याही गुन्ह्यात नाव अजून समोर आलं नाहीये, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
हे ही वाचा >> Pune Murder: भर रस्त्यात 5 गोळ्या झाडल्या, माजी नगरसेवकाच्या हत्येनंतर पवारांचा नेता संतापला!
सख्या जावयानेच वनराज यांची हत्या केल्याचं समोर आलंय. कौंटुबिक वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपी गणेश कोमकर असं वनराजच्या जावयाचं नाव आहे. गणेश आंदेकर याने स्वत:;ची गँग तयार केली होती. कौंटुबिक वादातून त्याने हा खुनाचा कट रचला.
आपल्यावर हल्ला होणार याची कल्पना वनराज आंदेकरांन आधिच होती, त्यामुळे ते सोबत माणसं घेऊन फिरायचे. पण रविवारी घरगुती कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्यासोबत मुलं नव्हती. याचवेळी हल्लेखोरांनी कट रचला आणि ही हत्या केली.
वनराज आंदेकर आहे तरी कोण?
- वनराज यांची आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या.
- चुलते उदयकांत आंदेकर हे देखील माजी नगरसेवक आहेत.
- 2017 ला झालेल्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत वनराज आंदेकर हे निवडून आले होते.
-2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते.
- आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात महापौर राहिलेल्या आहेत.
ADVERTISEMENT