Amravati Murder : डोक्यात संशयाचं भूत शिरलं, युट्यूबर व्हिडिओ बघून आई-भावाला…

मुंबई तक

• 02:04 PM • 05 Sep 2023

Amravati Murder : आईवर संशय आल्याने मुलाने आपल्या आईलाही आणि भावालाही भूल देऊन त्यांची हत्या केली. त्या दोघांची हत्या करुन अमरावतीहून आरोपी मुलगा हैदराबादला पळून गेला.

Amravati Murder mother brother murder

Amravati Murder mother brother murder

follow google news

Amravati Murder : अमरावती जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने आपल्या आईला आणि भावला भूल देऊन त्यांची हत्या (Murder) केली आहे. त्या मुलाने पहिल्यांदा भाजीतून आपल्या आईला धतूरा घालून त्यांना ते खायला लावले तर त्यानंतर त्याची आई कमजोर झाल्यानंतर आपल्या आईला स्लाईनमध्ये भूल देऊन आईची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता हैदराबादमधून त्या मुलाला अटक करण्यात आली आहे. (suspecting mother character son killed mother brother amravati injecting anesthetic)

हे वाचलं का?

आई-भावाला भूल दिली

आई आणि भावाला भूल देऊन हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील शिवाजी नगर भागात घडली आहे. मागील महिन्यात ऑगस्टमध्ये सौरभ कापसेने आई नीलिमा आणि लहान भाऊ आयुषची हत्या करून तो हैदराबादला पळून गेला होता. त्यानंतर घरातून शेजाऱ्यांना दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगेंनी वाढवलं शिंदे सरकारचं टेन्शन, शिष्टमंडळ बैठकीत काय घडलं?

मृतदेह ठेवले पेटीत

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घराचे कुलूप तोडन आतमध्ये प्रवेश केले. पोलिसांनी आत घरात प्रवेश करताच घरातून दुर्गंधी आणि मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. ही दोन्ही मृतदेह पेटीमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर हत्या करणाऱ्या मुलाची माहिती त्यंनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व चौकशी करुन आरोपी मुलाला हैदराबादमधून अटक करण्यात आली.

आईच्या चारित्र्यावर संशय

मुलाला अटक केल्यानंतर पोलिसांनी माहिती देताना सांगितली की, आईच्या चारित्र्याच्या संशयावरुन त्याने आईच्या हत्येचा कट रचला होता. तर या प्रकरणामुळेच त्याने लहान भावाचीही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> NCP Jalgaon Sabha : ‘…तर तुम्ही सरकारमध्ये काय करता?’; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

जेवणातून दिला धतूरा

या प्रकरणाची पोलीस अधिकार किरण वानखडे यांनी माहिती देत असताना म्हणाले की, आरोपीने आधी धतुऱ्याचे दाणे भाजीप मिसळून आई व लहान भावाला जेवणातून दिले. धतुऱ्याचे दाणे खाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याने आईला आणि भावावर रुग्णालयात घेऊन जाऊन उपचार केले. त्यावेळी त्याने आपल्या कपाऊंड मित्राला हाताशी धरुन त्याने मित्राच्या मदतीने सलाईनमधून भूल देण्याचे औषध देऊन दोघांचीही हत्या करण्यात आली.

आरोपी अभियांत्रिकीचा विद्यार्थी

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर माहिती घेतल्यावर तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. तर त्याचे अनेक मित्र हे वैद्यकीय क्षेत्रातील असून त्याने इंटरनेट व युट्युवरुन व्हिडिओ पाहून त्याला आई व भावाच्या हत्येचा कट रचला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp