मनोज जरांगेच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, एका मागून एक लांबवले दागिने

मुंबई तक

• 12:54 PM • 25 Dec 2023

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जोरदार सभा सुरू आहेत. त्या सभांना मोठी गर्दी होत असल्याने त्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. लातूरमधील सभेतील नागरिकांच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलिसात तक्रार दाखल झाली होती, त्यानंतर एका चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दागिने जप्त करण्यात आले आहेत.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Latur Crime : सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभा होत आहेत. मात्र आता या गर्दीत होणाऱ्या सभांचा फायदा सोने, पैसे आणि दागिने लंपास करणारे चोरटे घेऊ लागले आहेत. कारण लातूरमध्ये जरांगे पाटलांची सभा होती, त्यादिवशी गर्दीचा फायदा उठवत अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन आणि दागिने लंपास केल्याची तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी 33 वर्षाच्या चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 2 लाखाची चैन पोलिसांनी जप्त केली आहे.

हे वाचलं का?

आणखी काही गुन्हे

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आता तपास सुरु केला असून आणखी काही चोरीचा उलघडा होतो त्याची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीचा फायदा उठवत लोकांच्या गळ्यातील दागिने पळवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली असून त्याच्या चोरीचा गुन्हाही दाखल केला आहे.

हे ही वाचा >> संसदेतील घुसखोर प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी दागिने घेतले ताब्यात

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी पोलिसांनी उमेश टालेला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडे असलेली 2 लाखाची सोन्याची चैनही जप्त करण्यात आली आहे. त्याने आणखी कोणत्या ठिकाणी चोरी केली आहे का ? आणखी कोणत्या प्रकरणात त्याचा हात आहे त्याचीही पोलीस चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दारूसाठी आईला तोडले

हे प्रकरण ताजे असतानाच लातूरमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारूसाठी आईने पैसे दिले नाहीत. म्हणून युवकाने घरातील कुऱ्हाडीने आईच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली आहे. या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावरही हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री अहमदपूरमधील सतालामध्ये घडली आहे.

हत्येनंतर दुसऱ्या दिवशी अटक

आरोपी ज्ञानेश्वर नाथराव मुंडेने त्याची आई संगिता नाथराव मुंडेकडे दारूसाठी पैसे मागत होता. त्यावेळी त्याच्या आईने पैसे देण्यास नकार देताच कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून आईला ठार करण्यात आले. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    follow whatsapp