Thane Crime : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला यूपी पोलिसांनी ठाण्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोशल मीडियावरून योगी आदित्यनाथ यांना रुद्रपूर तालुक्यातील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड (Murder Case) प्रकरणी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील देवरिया पोलिसांनी ठाण्यातून आरोपीली अटक केली आहे. अटक केलेल्या युवकाचे नाव अजित कुमार यादव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
आरोपीच्या शिक्षेमुळे संताप
उत्तर प्रदेशमधील रुद्रपूर तालुक्यातील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 2 महिन्यांच्या सुनावणीनंतर तहसीलदार न्यायालयाकडून आरोपींना शिक्षा कायम ठेवून आरोपींचा अर्ज फेटाळला होता. त्या प्रकरणीच अटक केलेल्या अजित कुमार यादवने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
हे ही वाचा >>अखेर आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, कानशिलात लगावलेलं प्रकरण भोवणार
कारवाईचा बडगा
रुद्रपूर तहसीलदार न्यायालयाकडून या हत्याकांड प्रकरणातीली आरोपी प्रेमचंदवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर प्रेमचंदच्या बाजूच्या लोकांनी जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र ही पुनर्विचार याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.
आरोपीच्या घरावर बुलडोझर
प्रेमचंदची पुनर्विचार याचिका जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्यामुळे ठाणे येथे राहत असलेल्या अजित कुमाल यादवने सोशल मीडियावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांकडून आरोपी प्रेमचंदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार होते, त्याचे घर उद्धवस्त करण्यात येणार असल्याची माहिती त्याला समजल्यानंतर त्याने ही योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
थेट मुख्यमंत्र्यांना धमकी
मुख्यमंत्र्यांना थेट धमकी देण्यात आल्याने अजित यादव विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याचा तपास केल्या नंतर ठाणे येथे राहत असल्याचे देवरिया पोलिसांना समजले. त्यानंतर देवरिया पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने अजित कुमारला अटक केली आहे. त्यानंतर त्याला विमानाने उत्तर प्रदेशला घेऊन जाऊन त्याला न्यायालयात सादर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी महाविद्यालयीन युवक
पोलिसांनी सांगितले की, आरोपी अजित यादव हा मूळचा भदोही जनपद येथील असून टिकैतपूरमधील तो रहिवासी आहे. मात्र कुटुंबासह तो सध्या कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात राहत असून ठाण्यातील एका महाविद्यालयातून तो पदवीचे शिक्षण घेत आहे.
ADVERTISEMENT