Ulhasnagar Traffic Police vs Auto Driver Viral Video : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुलाजवळ वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकात वाद झाला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्यानं या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोघांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस पुलाजवळ ऑन ड्युटी होते. त्याचवेळी रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात वादाची ठिणगी पडली. दोघांमध्ये वाद वाढत गेला. त्यानंतर चालकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली. पोलिसानेही चालकाला खाकीचा इंगा दाखवला. दोघांमध्ये सुरु झालेल्या भांडणाचा व्हिडीओ आजूबाजूला असलेल्या लोकांनी कॅमेरात कैद केला. त्यानंतर हा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.
इथे पाहा वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकाच्या हाणामारीचा व्हिडीओ
सोशल मीडियाच्या एक्सवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, गुलाबी टी शर्ट घातलेला व्यक्ती ऑन ड्युटी असलेल्या वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारत आहे. त्या व्यक्तीने वाहतूक पोलिसावर हल्ला केल्यानंतर दुसरा पोलीस हाणामारी करणाऱ्या व्यक्तीला पोलीसी खाक्या दाखवून प्रत्युत्तर देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
तसच रिक्षा चालकानेही पोलिसावर हात उचलल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. रिक्षा चालकांचे अशाप्रकारे वादविवाद झाल्याचे काही व्हिडीओ इंटरनेटवर यापूर्वीही व्हायरल झाल्याचं समजते. पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक झाली की नाही, याबाबत अद्यापदी अधिकृत माहिती समोर आली नाहीय.
ADVERTISEMENT
