Noida Porn Content Gang: नोएडा: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 28 मार्च 2025 रोजी नोएडा येथील Subdigi Ventures Private Limited वर छापा टाकला. पण या छापेमारी दरम्यान, जी गोष्ट समोर आली त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला. कारण यावेळी या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न साइट्ससाठी कंटेंट अपलोड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला. हा छापा परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत टाकण्यात आला, ज्यामुळे पोलिसांना समजलं की, कंपनीचे संचालक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव हे त्यांच्या घरातून एक अडल्ट वेबकॅम स्टुडिओ चालवत होते.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
हे जोडपे सायप्रस स्थित Technius Limited नावाच्या कंपनीत काम करत होते, जी Xhamster आणि Stripcha सारख्या पॉर्न साइट्स चालवते. सोशल मीडियावर जाहिराती देऊन मॉडेल्सची भरती केली जात होती, ज्यांचे काम लाईव्ह कॅमेऱ्यावर अश्लील कंटेंट अपलोड करणे होते.
हे ही वाचा>> Crime News: हॉटेलमध्ये सेक्स करताना तरुणीचा मृत्यू! गुजरातमध्ये हे काय घडलं?
या जोडप्याने बँकेत चुकीचा पर्पज कोड वापरून परदेशी कंपन्यांकडून पैसे मागितले. हे जाहिराती आणि मार्केट रिसर्चसाठी दिलेले पैसे म्हणून दाखवण्यात आले होते. तपासात आतापर्यंत 15.66 कोटी रुपयांचा बेकायदेशीर परदेशी निधी समोर आला आहे, ज्यापैकी 75% रक्कम जोडप्याने स्वतःकडे ठेवली होती आणि 25% रक्कम मॉडेल्सना देण्यात आली होती. छाप्यादरम्यान, ईडीने स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या मॉडेल्सचे जबाबही नोंदवले आहेत. तसेच, बँक व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा>> 'तर माझा जीवच जाईल...', सेक्स टुरिझमचा हा नेमका प्रकार तरी काय?
ईडी लवकरच या प्रकरणात आणखी अटक करू शकते आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखत आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे देशातील पॉर्न कंटेंट निर्मितीचे बेकायदेशीर नेटवर्क उघड झाले आहे, ज्याद्वारे परदेशी निधीचा गैरवापर केला जात आहे.
ADVERTISEMENT
