UP Rape Case: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Uttar Pradesh Ghaziabad) 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape)करून तिच्याबरोबर अनैसर्गिक पद्धतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ज्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार झाला आहे, तिची आईचे निधन झाले असून ती सध्या आपल्या आजीकडे राहत होती. ती आज शेजारी जेवायला गेलेली असताना तिथे आलेल्या युवकाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला तो पळवून घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
आठवड्यानंतर प्रकार उघड
गाझियाबादमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर त्या मुलाने हे कोणाला सांगितले तर तुला ठार मारणार असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने पहिल्या दिवशी तिने आजीला काहीच माहिती दिली नाही. मुलगी झालेल्या प्रकारामुळे घाबरली होती, त्यामुळे तिने सात दिवसानंतर तिने आपल्याबाबत घडलेला प्रकार आजीला सांगितला.
हे ही वाचा>> ‘RBI सह मुंबईतील 11 ठिकाणं बॉम्बने उडवून देऊ’, धमकीच्या ई-मेलमुळे पोलीस अलर्ट
आजीने केली तक्रार
मुलीने आजीला आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितल्यानंतर आजीने पोलीस स्थानकात जाऊन त्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आजीने सांगितले की, मुलगी घरी एकटी असताना तिच्याबरोबर ही दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे त्या मुलाला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
नराधमाला अटक
या घटनेची माहिती सांगताना पोलीस म्हणाले की, ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे. ती मुलगी मुळची बिहारची असून तिची आईचे निधन झाल्यामुळे ती राहायला आजीकडे आली होती. मात्र मुलीच्या परिस्थितीचा फायदा उठवत त्या तरुणाने तिला पळवून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नराधमाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT