Ghaziabad Crime News: गाझियाबादमध्ये कौशांबीमधील वैशाली चौकीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहित महिलेने पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने तिने सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाला असून त्या घटनेचा तिला मानसिक धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
नुकताच झाला होता विवाह
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'अभिषेक आहुवालिया आणि अंजली यांचा तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघंही प्राणीसंग्रहालयला भेट देण्यासाठी गेले होते.
छातीत आली कळ
प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी गेल्यानंतर अंजलीच्या नवऱ्याच्या छातीच दुखायला सुरुवात झाली. छातीत दुखायला लागल्यामुळे अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.'
पत्नीला बसला मानसिक धक्का
अभिषेकचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र अंजलीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर अभिषेकचा मृतदेह त्याच्या घरी घेऊन जाण्यात आला. त्यावेळी आपल्या पतीचा मृत्यू झाल्याच्या त्या मानसिक धक्क्यातूनच तिने सातव्या मजल्यावरून घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली.
मृत्यूबरोबर झुंज
अंजलीने सातव्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या ती मृत्यूबरोबर झुंज देत असून तिला लवकरच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
ADVERTISEMENT