Triple Murder : उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना दिसते आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच महिलांच्या सुरक्षितेतचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. एकीकडे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली जात असतानाच कौशांबी जिल्ह्यात जमिनीच्या वादातून तिघांची निघृणपणे हत्या (murder) करण्यात आली आहे. तिघांची हत्या झाल्याचे समजताच मोईनुद्दीनपूर गौस गावातील नागरिकांनी संतप्त होत, हत्या करणाऱ्यांच्या घरांना आग लावली आहे. नागरिकांनी केलेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी गावात येत मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना आधी ताब्यात घ्या नंतर मृतदेह ताब्यात देणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
ADVERTISEMENT
जमिनीचा धुमसता वाद
मोईनुद्दीनपूर गौसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीचे वाद सुर होते. त्या वादातून गावामध्ये तिहेरी हत्याकांड झाले. हत्या झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अनेक घरांना आग लावून आरोपींना ताब्यात घेण्याची मागण नागरिकींनी केली आहे. गावामध्ये जाळपोळीची घटना घडल्यामुळे गावाला आता पोलिसी छावणीचे रुप प्राप्त झाले आहे.
हे ही वाचा >> ‘अजित पवारांना वाटतं पाप केलं’ संजय राऊतांनी राष्ट्रवादीतील खदखद सांगितली
बाप, मुलगी आणि जावयालाही चिरले
सांदीपनघाट पोलीस हद्दीतील मोईनुद्दीनपूर गौसमध्ये होरीलाल यांचा त्याच गावातील सुभाष याच्याबरोबर जमिनीच्या हद्दीवरून जोरदार वाद झाला होता. त्यांच्या जमिनीचा वाद दिवसभर धुमसत होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी होरीलाल, त्यांची मुलगी ब्रिजकली आणि जावई शिवशरण या तिघांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या घटनेची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुभाष यांच्या घराला आग लावण्यात आली. त्याचबरोबर त्याना सहकार्य करणाऱ्यांच्या घरालाही आग लावण्यात आली. या आगीत घरे आणि दुकानेही पेटवून देण्यात आली आहेत.
हे ही वाचा >> Gokul Dudh Sangh Meeting : बॅरिकेट्स तोडण्याचा… गोकुळच्या सभेत राडा, प्रकरण काय?
आरोपींची घरं जाळली, दुकानं पेटवली
मोईनुद्दीनपूर गौसमध्ये हत्याकांड होऊन जाळपोळ झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हत्या झालेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्याआधी आरोपींना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यावरून वाद होऊन आरोपींच्या घरांना आग लावून काही दुकानंही पेटवून देण्यात आली. त्यामुळे हा वाद टोकाला गेल्या असून गावामध्ये पोलीस संरक्षण वाढवले आहे.
पोलीस जोपर्यंत हत्या करणाऱ्यांना ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मृतदेह पोलिसांना ताब्यात घेऊ देणार नाही असा पवित्रा मोईनुद्दीनपूर गौसमधील ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही पोलिसांना मृतदेहांना हात लावू दिला गेला नाही.
ADVERTISEMENT