मुलीनं आय लव्ह यू मम्मी-पप्पा लिहून जीवनयात्रा संपवली, नंतर आई-वडिलांनीच…

मुंबई तक

15 Sep 2023 (अपडेटेड: 16 Sep 2023, 09:15 AM)

Crime News:  उत्तर प्रदेशमध्ये एक प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामध्ये महिलेचा मृतदेह बाथरुमध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. मात्र भिंतीवर लिहिलेल्या मजुकारामुळे आता पोलीसही चक्रावले आहेत.

Pune Indapur Hagarewadi Crime News bodies of mother and daughter were found hanged

Pune Indapur Hagarewadi Crime News bodies of mother and daughter were found hanged

follow google news

Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह बाथरुमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ज्या बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे, त्यामध्ये लिहिले होते की, आय लव्ह यू आई-बाबा, तुम्ही माझ्या पतीला कोणताही त्रास देऊ नका. ही घटना मृत मुलीच्या माहेरी समजल्यानंतर मात्र तिच्या वडिलांनी सासऱ्याच्या लोकांविरुद्ध हुंडा आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पतीसह त्याच्या आई वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (uttar pradesh woman body found in bathroom in lucknow lclag i love you mom and dad dont do anything to husband)

हे वाचलं का?

बाथरुमचा दरवाजा तोडला

बाथरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, बाराबंकीमध्ये राहणारी मोनिका वर्मा यांचा लखनऊच्या गुडंबा येथील अभिषेक वर्माबरोबर विवाह झाला होता. काल दुपारी बारा वाजता महिला बाथरुमध्ये गेली होती, खूप उशीर झाल्यानंतरही मोनिका बाथरुमच्या बाहेर आली नाही. त्यानंतर सासरच्या मंडळांनी दरवाजा ठोठवला, तरीही दरवाजा उघडत नसल्याने सासरच्या मंडळींनी बाथरुमचा दरवाजा तोडला. त्यानंतर महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्यानंतर सासरच्या मंडीळींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा >> Girl Child: अवघ्या 7 दिवसांच्या मुलीला क्रूर आई-वडिलांनी फेकलं कुत्र्यांसमोर, पण..

पतीला त्रास देऊ नका

सासरच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेचा लटकणारा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करताना बाथरुमच्या भिंतीवर मात्र आय लव्ह यू मम्मी-पप्पा, पती अभिषेकला तुम्ही कोणताही त्रास देऊ नका असं लिहिलेलं त्यावर दिसून आले. त्यानंतर मृत मोनिकाच्या आई वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

सासर कुटुंबीयांवर गुन्हा

मृत मोनिकाच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मुलीच्या सासरी तिच्यासोबत तिच्या दोन्ही नणंद राहतात. त्यांच्याबरोबर भाचा आणि त्यांचा मामा सुमित सिंहही राहतो. या सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीला ते त्रास देत होते. हुंड्यासाठी वारंवार त्रास देत होते. लग्न झाल्यापासून 15 लाख रुपये तिच्यासाठी खर्च केला होता, त्यानंतरही त्यांना अनेकदा पैसे दिले होते.

हे ही वाचा >> Triple Murder : एकाच कुटुंबीतील तिघांचा चिरला गळा, नंतर लोकांनी आरोपीचं घरच पेटवलं

फक्त पैशांची मागणी

आता पुन्हा सासरच्या लोकांनी पैशाची मागणी केली होती. ती पैशाची मागणी पूर्ण केली नाही. म्हणूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून करुन लटकवला होता असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. हा गुन्हा लपवण्यासाठी भिंतीवर माझ्या पतीला त्रास देऊ नका असं लिहिण्याचे नाटक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    follow whatsapp