"100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय

विशाल गवळी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तळोजा तुरुंगात होता. खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने तुरुंगातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन स्वत:ला संपवल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

13 Apr 2025 (अपडेटेड: 13 Apr 2025, 02:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विशाल गवळीने आत्महत्या केली की घातपात झाला?

point

सकाळी घटना घडताच कुटुंबीय जेलमध्ये दाखल

point

"विशाल आत्महत्या करूच शकत नाही"

point

विशालच्या जिवाला धोका होता, आरोपीच्या वकिलांची माहिती

Vishal Gawli Case : "माझा 100 किलोचा भाऊ टॉवेलने कसं लटकून घेऊन शकतो" असा सवाल मृत आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाने केला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये 12 वर्षीय मुलीचं अपहरण, बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी तळोजा तुरुंगात होता. याच आरोपीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीने स्वत:ला कसं संपवलं? कशी होती 'चीड आणणारी' क्राईम हिस्ट्री?

आरोपी विशाल गवळीने आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुरुंगातील शौचालयात टॉवेलचा वापर करून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कुटुंबाचा दावा काय? 

विशाल गवळीच्या वकिलांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या आत्महत्येवर शंका व्यक्त केली आहे. आरोपीच्या कुटुंबाने पीडितेच्या वडिलांवर आरोप केले आहेत. विशालच्या बहिणीने या घटनेसाठी पीडित कुटुंबालाच जबाबदार धरलं आहे.  माझा 100 किलो वजनाचा भाऊ टॉवेलला कसा लटकू शकतो, असा प्रश्न बहिणीने उपस्थित केला आहे. आरोपीची बहीण वकिलासह तळोजा तुरुंगात पोहोचली आहे. मी काही दिवसांपूर्वी भावाशी बोलल्याचा दावा तीने केला आहे. 8 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करणार होते असाही दावा केला आहे.  आरोपी विशालचं कुटुंब सध्या तळोजा तुरुंगात दाखल झालं आहे.

"अक्षय शिंदेसारखंच विशाल गवळीलाही..."

"आरोपी विशाल गवळीने मला सांगितलं होतं की मला धोका आहे. अक्षय शिंदेसारखं विशाल गवळीलाही मारतील असं मी न्यायालयाला अर्जात सांगितलेलं होतं. आम्हाला 100 टक्के संशय आहे की पोलीस यंत्रणेनं त्याला मारलंय. आम्ही तुरूंगात जाऊन माहिती घेऊ. मी विशाल गवळीला भेटलो होतो, त्यावेळी तो म्हणाला होता की मी काही केलं नाही, त्याने मला बरीच माहिती दिली होती" असं विशाल गवळीचे वकील संजय धनके म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> ईडीची थेट 661 कोटीच्या मालमत्तेवर टाच, काँग्रेसला दणका, नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?

विशाल गवळी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तळोजा तुरुंगात होता. खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने तुरुंगातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.  मृतदेहाचं पोस्टमॉर्टम जे.जे. रुग्णालयात होतंय. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. 

    follow whatsapp