गुंड घायवळला नडणाऱ्या पैलवानाची क्राईम हिस्ट्री, समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओत काय?

Nilesh Ghailwal: वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकरविरुद्ध IPC कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून, सखोल चौकशी सुरू आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

14 Apr 2025 (अपडेटेड: 14 Apr 2025, 10:53 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

निलेश घायवळला मारहाणारा पैलवान कोण?

point

निलेश घायवळ याला मारतानाचा दुसरा व्हिडीओ समोर

point

पैलवानाचं नाव, गाव आणि क्राईम हिस्ट्री...

Crime News : पुण्यातील कुख्यात डॉन निलेश घायवळ, ज्याचं नाव कधीकाळी शहरात दहशतीचं प्रतीक होतं, त्याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील अंद्रुड गावातील जत्रेदरम्यान कुस्तीच्या आखाड्यात हल्ला झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (11 एप्रिल 2025) संध्याकाळी घडली. याचा व्हिडिओ ‘मुंबई तक’च्या हाती लागला आहे.

हे वाचलं का?

नव्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

नव्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, निलेश घायवळ आपल्या काही साथीदारांसह कुस्तीच्या आखाड्याचा फेरफटका मारत होता. तेव्हा सागर मोहोळकर नावाचा एक तरुण अचानक गर्दीतून पुढे येऊन घायवळच्या कानाखाली जोरदार थप्पड मारतो. या हल्ल्यामुळे घायवळ हडबडला आणि दोन पावलं मागे सरकला. हल्लेखोर सागर घटनास्थळावरून पसार झाला होता, पण आता त्याची ओळख पटली आहे.

गुंड घायवळच्या कानशीलात लगावणारा तो कोण? 

सागर मोहोळकर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो कुस्तीगीर आहे. त्या दिवशी तो धाराशिवमधील अंद्रुड गावच्या जत्रेत कुस्ती पाहण्यासाठी आला होता. आयोजक आणि कुस्तीगीरांशी भेटण्याच्या दरम्यान त्यानं गर्दीतून पुढे येत घायवळवर हल्ला केला.

पोलिसांची कारवाई

वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकरविरुद्ध IPC कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून, सखोल चौकशी सुरू आहे. तपासात समोर आलं की, सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे, त्याच्यावर दोन खुनाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हल्ल्याचं कारण कारण?

सागरने निलेश घायवळवर हल्ला का केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामागे काही जुनं वैर होतं की आणखी काही कारण? याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. मात्र, निलेश घायवळसारख्या कुख्यात गुंडालाच ही मारहाण झाल्यानं ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

    follow whatsapp