Saif Ali Khan Attack and Underworld Connection: मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत, महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी या गंभीर घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 'हा चोरीचा प्रकार होता. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरी आला होता आणि त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.' या हल्ल्यामागे कोणत्याही गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी नाकारले आहे. त्यांच्या मते, अंडरवर्ल्ड गँगचा यामध्ये सहभाग नाही. (was the underworld behind attack on actor saif ali khan what was the reply given by minister yogesh kadam)
ADVERTISEMENT
सैफ अली खान त्याच्या घरी असताना एका हल्लेखोराने त्याच्या घरी येऊन त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. ज्यानंतर तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत, सैफच्या मणक्याजवळून चाकूचा तुकडा काढण्यात आला, ज्याबद्दल डॉक्टरांनी सांगितले की जर चाकू आणखी दोन मिमी आत गेला असता तर सैफचा जीवाला अधिक धोका निर्माण झाला असता.
हे ही वाचा>> Saif Ali Khan Stabbed : सैफवर चाकूचे 6 वार, घरातले इतर सदस्य कुठे होते? टीमने काय म्हटलं? करिश्माच्या स्टोरीवर..
लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्तमणि म्हणाले की, सैफला आता आयसीयूमधून एका विशेष खोलीत हलविण्यात येत आहे.
ताब्यात घेतलेली व्यक्ती नेमकी कोण?
दरम्यान, मुंबई पोलीस सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याची चौकशी करत आहेत. पोलीस पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते ज्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्यक्तीशी जुळत होता. महाराष्ट्राचे मंत्री योगेश कदम यांनीही सांगितले की, 'पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा माग काढत आहेत.' तर मुंबई पोलिसांचे (कायदा आणि सुव्यवस्था) अधिकारी सत्यनारायण चौधरी म्हणाले की, 'ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे तो हल्लेखोर नव्हता.'
हे ही वाचा>> Saif Ali Khan Attack: नाव शाहिद, याआधीही त्याने... सैफवर हल्ला करणारा आहे महाभयंकर आरोपी!
'या घटनेमागील एकमेव कारण चोरी'
योगेश कदम यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'या हल्ल्यात कोणत्याही गुन्हेगारी टोळीचा सहभाग नाही.' योगेश कदम यांनी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत या घटनेमागील चोरी हा एकमेव हेतू असल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, लाल स्कार्फमध्ये गुंडाळलेला आणि बॅग घेऊन आलेला संशयित हल्लेखोर सैफ राहत असलेल्या 'सतगुरु शरण' इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पायऱ्या उतरताना दिसत आहे.'
ADVERTISEMENT
