Who is Guddu Muslim : उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद मेडिकलसाठी हॉस्पिटलला जात असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येपुर्वी पत्रकार त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत होते. यावेळी अतिकचा भाऊ अश्रफने मीडियासमोर गुड्डू मुस्लिम हे शेवटचे नाव तोंडातून काढले होते आणि काही सेकंदात त्याची आणि त्याच्या भावाची गोळया झाडून हत्या करण्यात आली.त्यामुळे हत्येपुर्वी अश्रफच्या तोंडून जे शेवटचे नाव निघाले होते, तो गुड्डू मुस्लिम कोण आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.त्यामुळे जाणून घेऊयात हा गुड्डू मुस्लिम कोण होता? (who is guddu muslim whose name was being taken by atiqa brother before death)
ADVERTISEMENT
सुत्रांच्या माहितीनुसार गुड्डू मुस्लिम अतिक अहमदचा संपूर्ण नेटवर्क चालवायचा. सध्या त्याच्या डोक्यावर 5 लाखाचे बक्षिस असून तो फरार आहे. उमेश पालच्या हत्येनंतर गुड्डू फरार होऊन मेरठला गेला होता. 24 फेब्रुवारीच्या घटनेपासून पोलीस त्याच्या मागावर होते. 5 मार्चला समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार गुडडू मुस्लिम मेरठला गेला होता. मेरठमध्ये अतिकची बहिण आयशा नूरीच्या घरी गुड्डू मुस्लिम दिसला होता. आयशाचा पती अखलाकने गळाभेट करून त्याचे स्वागत केले होते. त्यानंतर गुड्डू मुस्लिमबाबतचा कोणताच पुरावा हाती लागला नव्हता.
हे ही वाचा : हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?
कोण आहे गुड्डू मुस्लिम ?
अतिक अहमदचा सर्वांत जवळचा गुड्डू मुस्लिम बॉम्ब बनवण्याचा तज्ञ मानला जातो. प्रयागराजचे शुटआऊट या गोष्टीची दाखला देतोय़. वयाच्या 15 वर्षापासून गुड्डू मुस्लिम गुन्हेगारीत उतरला होता. सुरुवातीला गुड्डू छोट्या-मोठ्या चोऱ्या माऱ्या करायच्या. त्यानंतर शहरातील बाहूबली म्हणजेच बड्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्याने बॉम्ब बनवायला सुरुवात केली. हळूहळू तो उत्तर प्रदेशसह बिहारमधील गॅंगमध्ये बॉम्ब एक्सपर्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे पुढे पाहता उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या प्रत्येक गुन्हयात गुड्डू मुस्लिमच नाव जोडेले गेले.
‘या’ बाहूबलींसोबत केलंय काम
गुड्डू मुस्लिमने अनेक बाहूबली आणि माफिया डॉनसोबत काम केले. गुड्डू मुस्लिम एकेकाळी श्रीप्रकाश शुक्लची सावली बनून राहायचा. माफीया नेता मुख्तार अन्सारीसाठी गुड्डू मुस्लिमने बॉम्ब बनवले होते. गुड्डू मुस्लिम दोन दशक पूर्व उत्तर प्रदेशच्या टोळीत प्रसिद्ध होता. 1997 मध्ये गु्ड्डने गेम टीचर फेड्रिक्स गोम्सची हत्या केली होती. दरम्यान एका प्रकरणात गुड्डू जेलमध्ये होता.तेव्हा त्याचं जामीन अतिकने करून दिले होते. यानंतर गुड्डू अतिकचा गुर्गा बनला. गुड्डू मुस्लिमचे तार बिहार माफियांसोबत देखील जोडले गेले होते. गुड्डूमुळेच अतिकचे नाते बिहार माफियांसोबत घट्ट झाल्याचे बोलले जाते.
हे ही वाचा : याच पिस्तूलमधून अतिक आणि अशरफला गोळी मारली होती; किती आहे किंमत?
गुड्डूवर 5 लाखाचं बक्षिस
फेब्रुवारी महिन्यात उमेश पालच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेजमध्येही गुड्डू मुस्लिम घटनास्थळी बॉम्ब फेकताना कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी उमेश पाल हत्याकांड प्रकरणी गुड्डूवर 5 लाखाचे बक्षिस जाहिर केले होते. या घटनेनंतर अद्याप गुड्डू मुस्लिम फरार आहे. अतिकने त्याच्या रिमांडमध्ये अनेकदा गुड्डू मुस्लिमचे नावे घेतले होते. त्याला भिती होती की, गुड्डू मुस्लिम पकडला जाईल, त्याचे एनकाऊंटर होईल. तसेच त्याच्याविषयीच अशी अनेक रहस्य तो उलगडेल.
गुड्डू मुस्लिमच्या मागावर एसटीएफची टीम आहे. या दरम्यान गुड्डूची कर्नाटकमध्ये शेवटचं लोकेशन सापडले होते. गुडडूसह उमेश पाल हत्याकांडातील इतर शूटर साबिर आणि अरमानचाही शोध घेतला जात आहे. मात्र या दोघांचा सुगावा अद्याप लागला नाही आहे.
ADVERTISEMENT