Apps Ban in India : भारत सरकारने 'या' 14 Applications वर बंदी का घातली, काय होतं कारण? समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई तक

18 Dec 2024 (अपडेटेड: 18 Dec 2024, 08:10 AM)

'Zangi' व्यतिरिक्त, Nandbox, 2nd Line, Threema, Safeswiss, Element, IMO, MediaFire, Briar, BChat, Crypviser, Enigma, आणि  Wickr Me या अॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती.

Mumbaitak
follow google news

WhatsApp आणि Telegram हे तुमच्या आवडीचे मेसेजिंग ॲप असतील, पण अनेकांना ते खुरेपणाने वापरता येत नाहीत. गुंड, दहशतवादी, बेकायदेशीर कामे करणारे गुन्हेगार हे काही वेगळ्या  ॲप्सवर अवलंबून असतात, ज्यांच्याबद्दल क्वचितच तुम्ही कधी ऐकलं असेल. यामुळेच भारत सरकारने काही ॲप्सवर बंदी घातली होती, ज्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी समस्या निर्माण होत होत्या.

हे वाचलं का?

केंद्राने Zangi नावाच्या एका अॅपवर बंदी घातली असून, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये असलेल्या कुख्यात टोळ्यांच्या अटक केलेलेल्या सदस्यांच्या फोनमध्ये हे अॅप आढळलं होतं. 'Zangi' हे 14 त्या मोबाईल ॲप्सपैकी एक आहे ज्यांवर गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात सरकारने "बंदी" घातली होती.

या ॲप्सवर बंदी....

'झांगी' व्यतिरिक्त, Nandbox, 2nd Line, Threema, Safeswiss, Element, IMO, MediaFire, Briar, BChat, Crypviser, Enigma, आणि  Wickr Me या अॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. हे ॲप्स जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संवाद साधण्यासाठी पाकिस्तानस्थित हँडलर वापरत होते अशीही चर्चा आहे.

हे ही वाचा >> Zakir Hussain यांचा ज्यामुळे मृत्यू झाला, तो IPF आजार नेमका काय? काय आहेत लक्षणं आणि उपचार?

या ॲप्सवरील संदेश ट्रॅक किंवा रीकव्हर केले जाऊ शकत नाहीत. इतर मोबाईल मेसेजिंग ॲप्सच्या तुलनेत झांगी, थ्रीमा, नंदबॉक्स, एलिमेंट सारख्या ॲप्सना वापरण्यासाठी वापरकर्त्यांना फोन नंबर किंवा ईमेल ॲड्रेस सारखी कोणतीही माहिती द्यावी लागत नव्हती. तसंच एक युजर दुसऱ्या युजरशी संपर्क साधण्यासाठी स्वतःची URL तयार करू शकतो.

उदाहरणार्थ, जर आपण Zangi बद्दल बोलत असून, तर वापरकर्त्यांना फक्त साइन अप करण्यासाठी युजन नेम आणि पासवर्ड तयार करावं लागचं. यानंतर, वापरकर्त्यांना 10 अंकी नंबर मिळतो, जो व्हर्च्युअल फोन नंबर म्हणून वापरला जाऊ शकतो.

 

हे ही वाचा >> LIC Unclaimed maturity Amount : पॉलिसी घेऊन विसरून गेले... LIC कडे कुणीच दावा न केलेले 880 कोटी रुपये
 

ॲपमध्ये "मिलिटरी ग्रेड" एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्याचं म्हटले जातं, ज्यामुळे वापरकर्त्यांचा मागोवा घेणं आणि त्यांचे संदेश रिकव्हर करणं कठीण होतं. 

इतर व्यावसायिक मेसेजिंग ॲप्सच्या तुलनेत, झांगी सारखे ॲप्स कोणत्याही सर्व्हरवर चॅटींग सेव्ह करत नाहीत. याचा अर्थ तपास यंत्रणा गुन्हेगारी प्रकरणात ते मेसेज रिकव्हर करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जर आपण Zangi बद्दल पाहिलं, तर त्यावरील मेसेज वाचल्यानंतर डिलिट केला जातो. हे ॲप कोणत्याही प्रकारचा डेटा गोळा करत नाही. हे ॲप्स हुकूमशाही देशांतील कार्यकर्ते, पत्रकार आणि विरोधी नेत्यांच्या वापरासाठी तयार करण्यात आल्याचे डेव्हलपर्सचे म्हणणे आहे.

तसंच, ज्याप्रमाणे कोणतीही मालमत्ता बेकायदेशीर हेतूंसाठी वापरली जाऊ शकते, त्याचप्रमाणे ॲप्सचा वापर वाईट हेतूने देखील केला जाऊ शकतो. विकर मी हे ॲमेझॉनचे ॲप होते, ज्याने गेल्या वर्षी त्याची सेवा बंद केली होती. या ॲपवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री शेअर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

    follow whatsapp