Anil Parab criticize Eknath Shinde : महायुतीत एकनाथ शिंदे 13 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. यापैकी 8 जागांवर शिंदेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर अद्याप 5 जागांवर उमेदवारीचा पेच कायम आहे. या जागांवर शिंदेंच्या उमेदवार बदलाची चर्चा आहे. यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर टीका केली आहे. (anil parab criticize eknath shinde on candidancy lok sabha election 2024 mahayuti vs maha vikas aghadi maharashtra politics)
ADVERTISEMENT
अनिल परब पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकसभेच्या उमेदवारांवर भाष्य केले. एकनाथ शिंदेंसोबत 13 खासदार गेले होते, या खासदारांना पुन्हा खासदार करणारच...आणि तुमच्यासोबत जे 40-50 आमदार गेले आहेत, त्यांनाही परत निवडून आणण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली होती, असे अनिल परब यांनी सांगितले.
हे ही वाचा : पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले...: आढळराव
यांच्यापैकी (खासदार) एकही व्यक्ती पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन, असे शिंदेंनी स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे आता त्यांनी (शिंदेंनी) शेतीच्या अवजारांना धार काढून ठेवावी, असा टोला अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
तुमानेंची उमेदवारी त्यांनी कापली, आता अजूनही बरेचशे उमेदवार वेटींगवर आहेत. नाशिकची जागा मिळेल की नाही माहित नाही. आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असे अनिल परब यांनी म्हटले.
हे ही वाचा : "भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव", शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने खळबळ
तसेच 13 जागा तर राखा आधी, नंतर मग उमेदवारांचे भवितव्य, निवडणूक, मग जिंकणे, त्याच्यानंतर राजीनामा...पण आता पहिल्या टप्प्यातच हे गळपाटलेत,अशी टीका परब यांनी शिंदेच्या शिवसेनेवर केली आहे. आजही 13 च्या 13 जागा राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 13 जागा राखता येईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे 13 जागा राखण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले, बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले, बाळासाहेबांनी अशा जागावाटपाला लाथ मारली असती. ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय. जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी प्रतिष्ठेने खेचून आणली होती, त्या जागेसाठी यांचा घामटा निघतोय. अशा परिस्थितीत त्यांचा कुठे गेला स्वाभिमान? कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? ,असा सवाल अनिल परबांनी ठाकरेंना केला आहे.
तुम्हाला भाजप फरफटत नेतेय आणि तुम्ही फरफटत चाललाय. मग तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देताय. तुम्ही नेहमी महाराजांची शपथ घेऊन शब्द पुर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात ना, मग यामधला एकही उमेदवार पडला तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, असे अनिल परब म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT