Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचे 55 लाखांचे कर्ज!

रोहिणी ठोंबरे

• 01:05 PM • 19 Apr 2024

सुप्रिया सुळेंवर 55लाख रूपयांचं कर्ज आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रूपये तर पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रूपये उसने घेतले होते. अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. अर्ज भरताना उमेदवाराची संपत्ती नमूद करावी लागते.

Mumbaitak
follow google news

Supriya Sule Wealth : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे बारामती. येथील नणंद भावजयमध्ये रंगलेली चुरशीची लढत खूपच रंजक आहे. राष्ट्रवादीत (NCP) पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून त्यांची लेक म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची उमेदवारी बारामतीतून (Baramati) घोषित करण्यात आली. तर त्यांच्याविरूद्ध अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशावेळी नणंद-भावजयमधील या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. (Baramati Lok Sabha Election 2024 Supriya Sule owes 55 lakhs From Sunetra Pawar and Parth Pawar)

हे वाचलं का?

बारामतीतून दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांची संपत्ती पतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) जाहीर करण्यात आली आहे. अशात एका गोष्टीची सध्या तुफान चर्चा होतेय. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंनी घेतलेलं 55 लाख रूपयांचं कर्ज आहे. 

सुप्रिया सुळे यांच्यावर 55 लाखांचं कर्ज!

सुप्रिया सुळेंवर 55लाख रूपयांचं कर्ज आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रूपये तर पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रूपये उसने घेतले होते. अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. अर्ज भरताना उमेदवाराची संपत्ती नमूद करावी लागते.

सुप्रिया सुळेंची किती आहे संपत्ती?

खासदार सुप्रिया सुळेंनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून (supriya sule Election Affidavit) त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती समोर आली आहे.  त्यांच्याकडील जंगम मालमत्ता 38 कोटी 6 लाख 48 हजार रूपये तर, स्थावर मालमत्ता 9 कोटी 15 लाख 31 हजार रूपयांची आहे.  त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश आहेत. सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती जवळपास 166 कोटी 51 लाख 86 हजार 348 रूपये एवढी आहे. गेल्या लोकसभा  निवडणुकीच्या तुलनेत पाहायचं झालं तर, त्यांच्या उत्पन्नात एक कोटी 8 लाख 97 हजार 348 रूपयांनी वाढ झाली आहे. सुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरासरी 5 कोटी 68 रूपये आहे. 

याशिवाय त्यांच्याकडे 2 कोटी 61 लाख 75 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर एकही वाहन नाहीये. सुळेंकडे असलेल्या शेतजमिनीचे मूल्य 5 कोटी 45 लाख 24 हजार रूपये आहे. 

बँक खात्यातील ठेवी 

  • सुप्रिया सुळे - 11 कोटी 83 लाख 29 हजार 195
  • सदानंद सुळे - 2 कोटी 57 लाख 74 हजार 150

रोख रक्कम 

  • सुप्रिया सुळे - 42 हजार 500
  • सदानंद सुळे -  56 हजार 200

शेअर्समधील गुंतवणूक 

  • सुप्रिया सुळे - 16 कोटी 44 लाख 24 हजार 140

  • सदानंद सुळे - 33 कोटी 57 लाख 58 हजार 962

राष्ट्रीय बचत योजना 

  • सुप्रिया सुळे - 7 लाख 13 हजार 500
  • सदानंद सुळे -  16 लाख 34 हजार 030 

कर्ज म्हणून देण्यात आलेली रक्कम 

  • सुप्रिया सुळे - 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 

  • सदानंद सुळे -  60 कोटी 8 लाख 71 हजार 253 

सोन्याचे मूल्य 

  • सुप्रिया सुळे - 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचं सोनं

  • सदानंद सुळे - 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपयांचं सोनं

चांदीचे मूल्य   

  • सुप्रिया सुळे - 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदी

  • सदानंद सुळे -  17 लाख 62 हजार 72 रुपयांची चांदी

    follow whatsapp