Lok Sabha : 'दिल्लीत पंकजाताईंची हवा', मतदान केंद्रावरच झळकला मजकूर; सोनवणे समर्थकांनी व्हिडिओ आणला समोर

मुंबई तक

25 May 2024 (अपडेटेड: 26 May 2024, 05:17 PM)

Bajarang Sonvane VS Pankaja Munde : बजरंग सोनवणे समर्थकांनी आता पुन्हा परळी शहरातील एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये मतदान यंत्राच्या बाजूलाच पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर चिटकवण्यात आले आहे. या मजकूरात "आकाशात फिरतो पक्षाचा थवा,बीड जिल्ह्यातच नव्हे तर दिल्लीत सुद्धा असणार पंकजाताईची हवा", असे लिहण्यात आले आहे.

beed lok sabha 2024 pankaja munde support poster visible at polling station bajrang sonwane supporters video release

मतदान यंत्राच्या बाजूलाच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या संदर्भातील मजकूर चिटकवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

follow google news

Bajarang Sonvane VS Pankaja Munde : बीड लोकसभा मतदार संघात बनावट मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonvane) यांनी केला होता. या संबंधित व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणले होते. आता आणखीण एक खळबल उडवणारा व्हिडिओ सोनवणे समर्थकांनी समोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये मतदान यंत्राच्या बाजूलाच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या संदर्भातील मजकूर चिटकवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. (beed lok sabha 2024 pankaja tai support poster visible at polling station bajrang sonwane supporters video release) 

हे वाचलं का?

बजरंग सोनवणे समर्थकांनी आता पुन्हा परळी शहरातील एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये मतदान यंत्राच्या बाजूलाच पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर चिटकवण्यात आले आहे. या मजकूरात "आकाशात फिरतो पक्षाचा थवा,बीड जिल्ह्यातच नव्हे तर दिल्लीत सुद्धा असणार पंकजाताईची हवा", असे लिहण्यात आले आहे. त्यामुळे या व्हिडिओनंतर आता निवडणुक आयोग काय कारवाई करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : Maharashtra मध्ये मतदान वाढलं.. नेमका कोणाला बसणार फटका?

दरम्यान याआधी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. अनेक पोलिंग एजंन्टसला गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी 19 गावात फेरमतदान घेण्याचीही मागणी केली होती. 

दरम्यान आता सोनवणे समर्थकांनी नवीन व्हिडिओ समोर आणल्यानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha : 'गुवाहाटीला जाण्यापूर्वी ठाकरेंना फोन केला, पण...',

 

    follow whatsapp