Mangesh Chivate Latest News : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नव्यानं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. कारण शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यत निधी विभागाच्या प्रमुखपदी डॉ.रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आलीय. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक विराजमान होते.
ADVERTISEMENT
कोण आहेत मंगेश चिवटे?
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात मंगेश चिवटे यांचा मोलाचा वाटा होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. कोरोना महामारीच्या काळात चिवटे यांनी रुग्णांना मदत केली होती. राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणण्यातही चिवटे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाचा >> Parbhani News : आंदोलनाला हिंसक वळण! पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं काय घडलं?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होतेय चर्चा
राज्याच महायुती सरकारची स्थापना झालीय. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 233 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41, जेएसएस 2 जागा जिंकल्या आहेत. राज्यात 16 डिसेंबरपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतेल जावे, असा प्रयत्न महायुतीकडून करताना दिसत आहे.
हे ही वाचा >> Breaking Maharashtra Parbhani Violence LIVE: भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू! कसा घडला अपघात?
काय म्हणाले मंगेश चिवटे?
"आज माझे अत्यंत जवळचे मित्र श्री रामेश्वर (भैय्या) नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा पदभार स्विकारल्यानंतर माझ्या कार्यकाळात राहिलेल्या महत्त्वाच्या कामांची यादी त्यांना सुपूर्द केली. १ यामध्ये खालील पत्रात नमूद केल्याप्रमाणे अनेक - विविध दुर्धर आजारांचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये नव्याने समावेश करण्यासंदर्भात निवेदन दिले. २ यासोबतच धर्मादाय रुग्णालयांच्या नियम अटीच्या धर्तीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये देखील अर्ज करताना यापुढे रुग्णांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १,६०,०००/- वरून ३,६०,०००/- करावी ( एक लक्ष साठ हजार वरून तीन लक्ष साठ हजार करावी) यासंदर्भातील निवेदन दिले. ३ तसेच; बेळगाव आणि सीमा भागातील रुग्णांना मदत करताना पारंपरिक GR मध्ये सामाविष्ट असलेल्या ८६५ गावांव्यतिरिक्त १००% मराठी भाषिक असलेल्या मराठी बांधवांना देखील या पुढील काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून मदत मिळावी अशी विनंती केली", असं मंगेश चिवटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.
ADVERTISEMENT