Bajrang Sonawane Reply Amol Mitkari : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी ''बीडच्या बाप्पांचा दादांना फोन'' आल्याचे ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.तसेच एक गळाला लागल्यासारखा बोलतोय, त्यामुळे लवकरच तुम्हाला मोठा पिक्चर दिसेल, असे मिटकरींनी म्हटले होते. अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) या आरोपावर आता बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. (beed lok sabha mp bajrange sonwane reply amol mitkari statement on sharad pawar ncp ajit pawar politics)
ADVERTISEMENT
बजरंग सोनवणे एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी मिटकरींच्या आरोपावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, ''अजित दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला तर याचा रेकॉर्ड कुणाकडे असतो, ऑपरेटरकडे, मग अमोर मिटकरी हे कोण आहेत? अजितदादांच्या बंगल्यावर ऑपरेटर आहेत का?, असा टोला देखील बजरंग सोनवणे यांनी मिटकरींना लगावला. मी म्हणतोय नाही. मला माहित नाही कोण आहेत ते मग विचारले पाहिजे ना'', असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! उमेदवार घेतला मागे
अमोल मिटकरी हे दिग्गज नाव मी काय बघितलं नाही. ते ट्विट करतात आणि त्याची दखल घ्यावी इतकी त्यांची पात्रता नाही. म्हणून दखल घेतली नसल्याचे बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी शरद पवार साहेबांची साथ सोडली तर घरात माझे वडील मला मारतील, माझी बायको मला नाश्ता देणार नाही, असे सोनवणे यांनी म्हटले आहे.
मिटकरींचे विधान काय?
अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंगळवारी ''बीडच्या बाप्पांचा दादांना फोन'' आल्याचे म्हटले होते. बीडचे बाप्पा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी अजितदादांना दोनदा फोन केल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे मिटकरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन याबाबत सविस्तर माहिती देखील दिली.
हे ही वाचा : 'अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचं नुकसान', RSS ने सुनावले खडे बोल
एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुरीचा प्रश्न आहे. तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल, आणि तो व्यक्ती स्वत: दादांना फोन करून विनंती करत असेल तर माझ्या सारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी भुषवणाह बाब आहे. यावरून अजित दादा राज्याच्या केंद्रस्थानी किती महत्वाचे व्यक्ती आहे हे ही दिसून येते. त्यामुळे एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा बोलतोय, त्यामुळे लवकरच तुम्हाला मोठा पिक्चर दिसेल, असे अमोल मिटकरी यांनी विधान करून खळबळ उडवून दिली.
ADVERTISEMENT