Saurabh Murder Muskan Rastogi: मेरठ: मेरठमधील सौरभ हत्याकांड प्रकरणासंबंधी दररोज वेगवेगळे किस्से समोर येत आहेत. आपल्या नवऱ्याची म्हणजेच सौरभची हत्या करणारी पत्नी मुस्कान रस्तोगी आता तुरुंगात गर्भवती असल्याची बातमी समोर आले आहे. मुस्कानच्या प्रेग्नेंसी टेस्टमध्ये ती आई बनणार असल्याचे समोर आले आहे. प्रश्न असा आहे की हे बाळ नेमकं आहे तरी कोणाचं? खरंतर, आपल्या पतीची हत्या करण्याआधी ती सौरभ सोबत तर राहिलीच होती. मात्र, सौरभच्या हत्येनंतर ती तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच साहिल शुक्ला याच्यासोबत हिमाचलला गेली होती. त्याठिकाणी तिने त्याच्याशी लग्न करुन हनीमून देखील साजरा केला होता.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय
या सगळ्या घटनेमुळे मुस्कानच्या गर्भात वाढणारं बाळ हे नेमकं कोणाचं आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. मुस्कानच्या सासरी म्हणजेच सौरभच्या घरच्यांना मुस्कान प्रेग्नेंट असल्याचे कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. याच बाबतीत सौरभच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मुस्कानच्या सासरच्या मंडळींनी तिच्या डीएनए टेस्टची मागणी केली आहे.
हे ही वाचा: सलमानला पुन्हा धमकी! 'कार बॉम्बने उडवू', व्हॉट्सॲपला आलेल्या मॅसेजमध्ये काय म्हटलंय?
मुस्कान प्रेग्नेंट असल्याचे समजताच काय म्हणाले सौरभचे कुटुंबीय?
सौरभ राजपूतचा भाऊ बबलू याने डीएनए टेस्ट करण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, मुस्कानच्या पोटात वाढत असलेलं मुल नेमकं कोणाचं आहे? हे जाणून घेण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याची गरज आहे. जर हे बाळ सौरभचं असेल तर ते त्या मुलाला स्वीकारतील, असं सौरभच्या भावाचं मत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सत्य बाहेर आणायचं असेल, तर डीएनए टेस्ट व्हायलाच हवी.
सौरभच्या भावाच्या मते, मुस्कानच्या पोटात कोणाचे मूल वाढत आहे हे शोधणे खूप महत्वाचे आहे? तो म्हणाला, हे मूल माझ्या भावाचे सौरभचे आहे की साहिलचे, की दुसऱ्या कोणाचे? हे सत्य बाहेर आले पाहिजे. जर हे मूल माझ्या भावाचे सौरभ असेल तर तो आणि त्याचे कुटुंब हे मूल स्वीकारतील.
हे ही वाचा: बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, अँटिग्वा, स्वित्झर्लंड... मेहूल चोकसी पळत राहिला, पोलिसांना कसा सापडला?
मुस्कानने तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच साहिलसोबत मिळून सौरभ राजपूतची हत्या केली होती, असं हत्येनंतर समोर आलं होतं . साहिल आणि मुस्कानने सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते तुकडे ड्रममध्ये भरुन नंतर त्यावर सिमेंट लावले. या सगळ्या घटनेनंतर मुस्कान आणि साहिल दोघे हिमाचल मध्ये गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मुस्कानसाठी सौरभ त्याच्या कुटुंबाच्या विरोधात गेला होता. सौरभ लंडनमध्ये काम करायचा. तो मुस्कानला भेटण्यासाठी मेरठला येत असे. दरम्यान, मुस्कानचे साहिल शुक्लाशी नातेसंबंध जुळले. मुस्कान आणि साहिलने प्लॅन बनवून सौरभला मारले होते.
ADVERTISEMENT
