BJP's Manifesto for General Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्प पत्र म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प पत्राचे अनावरण करण्यात आले. पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पुढील 5 वर्षे काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय मोफत मिळणार, याबद्दल काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (BJP released its manifesto for Lok Sabha election 2024)
ADVERTISEMENT
तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चार 'जाती' आहेत, हे लक्षात घेऊन संकल्प पत्र तयार करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधानांनी मोफत वीज योजना आणि मोफत धान्य योजनेंतर्गतही अनेक मोठ्या घोषणा केल्या.
स्वानिधी योजना (पीएम स्वानिधी योजना), उज्ज्वला योजना, आयुष्मान योजना आणि इतर योजनांची व्याप्ती वाढवण्याबाबतही घोषणा केली.
2029 पर्यंत मोफत रेशन
पुन्हा सरकार आल्यास पुढील पाच वर्ष गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल, अशी घोषणा भाजपने जाहीरनाम्यातून केली आहे. मोफत रेशन योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली.
हेही वाचा >> शरद पवारांकडून शिक्कामोर्तब! माढ्यासाठी केली उमेदवाराची घोषणा
या योजनेअंतर्गत 80 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत रेशन दिले जात आहे. 'गरिबांचे ताटही आम्ही सुरक्षित ठेवू', असे मोदी म्हणाले.
'सरकार स्थापन झाल्यास येत्या पाच वर्षांत पीएम आवास योजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल', असेही पंतप्रधानांनी सांगितले. 4 कोटींहून अधिक कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यात आली आहेत, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
७० वर्षांवरील सर्व वृद्धांना मोफत उपचार!
भाजपने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देणार,अशी घोषणा केली आहे. आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे मोदी यांनी जाहीनामा प्रसिद्ध करताना सांगितले.
हेही वाचा >> राज ठाकरे आणि MNS ची कहाणी येणार पडद्यावर! गुढीपाडवा मेळाव्यात काय घडलं?
याअंतर्गत इतर आरोग्य सेवांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनऔषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीने औषधे उपलब्ध करून दिली जातील. याशिवाय, ७० वर्षांवरील वृद्धांच्या सर्व श्रेणींनाही आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.
पाइपलाइनमधून एल.पी.जी
पंतप्रधान म्हणाले की, उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले जात असून, प्रत्येक घरात गॅसची सुविधा पोहोचली आहे. आता स्वस्त स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरात पाईपद्वारे पोहोचवला जाईल. याशिवाय ३ कोटी कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली जाणार आहेत.
मोफत वीज, मुद्रा योजना आणि इतर घोषणा
पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सौरऊर्जेद्वारे 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. एवढेच नाही तर सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून लोक वर्षाला हजारो रुपये कमवू शकतात.
हेही वाचा >> सलमान खानच्या घरावर कुणी झाडल्या 5 गोळ्या?
मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, पीएम स्वानिधी योजनेची व्याप्ती खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली जाईल.
ADVERTISEMENT