अमित शाहांसोबतचे 'ते' दोन फोटो शिंदेंनी का केले नाही शेअर?, अचानक निघून गेले गावी!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यासाठी अमित शाहा यांच्यासोबत दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीचे दोन फोटो हे समोर आले. पण एकनाथ शिंदे यांनी हे दोन्ही फोटो कुठेही शेअर केले नाही. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Mumbai Tak

एकनाथ शिंदे आणि अमित शाह (फाइल फोटो)

रोहित गोळे

• 09:19 PM • 29 Nov 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज?

point

अमित शाहांसोबतच्या बैठकीचे फोटोही केले नाही शेअर

point

शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्यापही कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. काल (28 नोव्हेंबर) रात्री उशिरा महायुतीच्या तीनही नेत्यांची अमित शाहांसोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. ज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. याच बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच बैठकीतील दोन फोटोही समोर आले होते ज्यामध्ये शिंदे हे निर्विकारपणे उभे असल्याचे दिसून आले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही फोटो आपआपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. पण शिंदेंनी हे फोटो कुठेही शेअर केलेले नाही. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

हे वाचलं का?

अमित शाह यांच्या घरी जी बैठक पार पडली त्याआधी शिंदेंनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. जे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं. पण त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत जी बैठक झाली त्याचा एकही फोटो त्यांनी शेअर केलेला नाही. या फोटोमध्ये शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?

याच बैठकीनंतर शिंदेंना या फोटोबाबतही विचारणा करण्यात आली. पण आपण नाराज नसल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं. पण असं असताना आज (29 नोव्हेंबर) अचानक ते आपल्या साताऱ्यातील दरे गावी निघून गेले. खरं तर एकनाथ शिंदे यांची महायुतीच्या नेत्यांसोबत एक बैठक पार पडणार होती. पण ही अचानक ही बैठक रद्द करून शिंदे हे गावी निघून गेले.

एकीकडे मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय त्यांना अपेक्षित असणारं गृहखातं देखील भाजप सोडणार तयार नसल्याचे शिंदेंची नाराजी वाढलं असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> Maharashtra New CM: अमित शाहांच्या घरी बैठकीत 'हे' ठरलं, अजितदादांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी?

एकनाथ शिंदेंनी ते फोटो का केले नाही शेअर?

आतापर्यंत अनेकदा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्या प्रत्येक वेळी शिंदेंनी अमित शाहांसोबतचे फोटो हे शेअर केले आहेत. मात्र, कालच्या बैठकीतील एकही फोटो सोशल मीडियावर शेअर न करणं यावरून आता अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

'त्या' फोटोमध्ये शिंदे नाराज?

अमित शाहांसोबतच्या बैठकीतील दोन फोटो हे समोर आले. ज्यामध्ये शिंदेंच्या चेहऱ्यावरील भाव हे बरंच काही सांगून जात आहेत. 

पहिला फोटो: या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीसा हे अमित शाह यांना फुलांचा गुच्छ देत त्यांचं स्वागत करत आहेत. तर एकनाथ शिंदे हे यावेळी शाहांच्या बाजूला उभे आहेत. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्मितहास्य करताना दिसत आहे. त्यांचं हेच हास्य बरंच काही सांगून जात असल्याचं आता बोललं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अमित शाह हे शिक्कामोर्तब करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे.

दुसरीकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे एकनाथ शिंदे हे मात्र काहीसे शांत असल्याचं दिसतं आहे. या फोटोमध्ये त्यांचा चेहराही निर्विकार दिसत आहे. त्यामुळे अशीही चर्चा आहे की, सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवण्याची शिंदेंची संधी ही हुकलेली असू शकते.

दुसरा फोटो: दुसऱ्या फोटोत अजित पवार हे अमित शाह यांना फुलांचा गुच्छ आणि शाल देऊन स्वागत करताना दिसत आहेत. या फोटोमध्येही अमित शाह, अजित पवार, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे हे खुलेपणाने स्मितहास्य करताना दिसत आहेत.

पण या फोटोमध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं चित्त अत्यंत शांत आहे. इथेही त्यांचा चेहरा हा पूर्णपणे निर्विकार असल्याचं दिसून येतंय. 

आणि दोन्ही फोटो एकनाथ शिंदे यांनी कुठेही शेअर केलेले नाहीत. ज्याची आता अधिकच चर्चा रंगली आहे.


 

    follow whatsapp